Join us  

MI vs KXIP Latest News : अर्शदीप सिंगनं उडवला हिटमॅन रोहित शर्माचा त्रिफळा; MIला दिले धक्के, Video

MI vs KXIP Latest News : सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाला आज खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2020) लढतीत मनोधैर्य उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( Kings XI Punjab) आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 8:26 PM

Open in App

MI vs KXIP Latest News : सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाला आज खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2020) लढतीत मनोधैर्य उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( Kings XI Punjab) आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. MI  संघ एका विजयामुळे प्ले-ऑफच्या समीप जाणार आहे तर आणखी एक पराभव KXIP संघाला या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरू शकतो. MI vs KXIP Latest News & Live Score 

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात रोहित शर्माला ( ९) माघारी पाठवून KXIPनं मोठं यश मिळवलं. अर्शदीप सिंगनं हिटमॅनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू न देता बाद केले. अर्शदीपनं ६व्या षटकात इशान किशनला ( ७) बाद करून MIला कोंडीत पकडले. क्विंटन डी'कॉक एका बाजूनं खिंड लढवत आहे. MI vs KXIP Latest News & Live Score 

पाहा मुंबई इंडियन्सच्या तीन विकेट्स

Kings XI Punjab XI: लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन, एम अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग  

Mumbai Indians XI: रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह  

टॅग्स :IPL 2020रोहित शर्माकिंग्स इलेव्हन पंजाबमुंबई इंडियन्स