Join us
Daily Top 2Weekly Top 5

वानखेडे स्टेडियमवर फुलली Love Story! फिल्मी स्टाईल प्रपोज अन् IPL मधील 'मिस्ट्री कपल’ची प्रेमाची मिठी व्हायरल

मिस्ट्री कपलच्या व्हिडिओवर कमेंटची 'बरसात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 17:49 IST

Open in App

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मैदानातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय सामन्यादरम्यान स्टेडियमवरील खास क्षणही चर्चेचाा विषय ठरत आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामन्या दरम्यान स्टेडियम स्टँडमध्ये दोन्ही संघातील चाहत्यांमध्ये प्यारवाली लव्ह स्टोरी फुलल्याचा खास क्षण पाहायला मिळाला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् स्टेडिमयवर फुलली नव्या मिस्ट्री कपलची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील बॉयफ्रेंड अन् त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या जर्सीतील गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईल केलेले प्रपोज अन् त्यानंतर दोघांनी एकमेकांना प्रेमानं मारलेली मिठी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याआधी काही क्रिकेटर्संनी स्टेडियम स्टँडवर आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करत आयुष्याची नवी सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यात आता नव्या मिस्ट्री कपलची भर पडली आहे. 

विरुष्कानं फ्लाइंग किससह व्यक्त केलं एकमेकांवरील प्रेम; या खास फ्रेमसह स्मृतीची रिअ‍ॅक्शनही व्हायरल

फिल्मी स्टाईल प्रपोज अन् IPL मधील 'मिस्ट्री कपल'ची प्रेमाची मिठी व्हायरल 

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्टेडियमवर जोडी जमल्याचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा जर्सी घातलेला चाहता केकेआरच्या जर्सीत शाहरुखच्या संघाला चीअर करणाऱ्या तरुणीला प्रपोज करताना दिसते. तो तिला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसला. पण त्याच्या हातातून अंगठी खाली पडली. मग ही जोडी जमल्याचा खास अनुभव घेण्यासाठी आजूबाजूच्या चाहत्यांनी ती अंगठी शोधण्यास सुरुवात केली. ती सापडल्यावर तरुणाने फिल्मी स्टाईल तरुणीला प्रपोज केले. तिचा होकार मिळाला अन् दोघांनी कडकडून एकमेकांना प्रेमाची मिठी मारली. अवघ्या २४ सेकंदाची लव्हस्टोरी सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. 

मिस्ट्री कपलच्या व्हिडिओवर कमेंटची 'बरसात'

मिस्ट्री कपल वेगवेगळ्या संघाला सपोर्ट करताना दिसले असले तरी त्यांची मनं जुळली अन् नवी लव्हस्टोरी फुलली ही गोष्ट नेटकऱ्यांना चांगलीच भावल्याचे दिसते. ही दोघे नेमकी कुठली आहेत त्यांच नाव काय हे सगळं गुलदस्त्यात आहे. पण मिस्ट्री कपलच्या आयुष्यातील खास क्षण दाखवणाऱ्या व्हिडिओवर कमेंटची बरसात होताना दिसत आहे. जोडीला अनेकजण शुभेच्छा देतानाही पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Love blooms at Wankhede! Filmy proposal, viral video of loving embrace.

Web Summary : At an IPL match, a Mumbai Indians fan proposed to a KKR supporter. The filmy proposal, complete with a dropped ring, ended in a loving embrace, going viral. The mystery couple's moment is winning hearts online.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगव्हायरल व्हिडिओऑफ द फिल्ड