Join us  

MI vs KKR: क्विंटन डी कॉकची फटकेबाजी; मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा विजय

MI vs KKR Latest News & Live Score : दिनेश कार्तिकनं ( Dinesh Karthik) फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी KKRच्या नेतृत्वाची जबाबदाली इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्याकडे सोपवली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 16, 2020 6:27 PM

Open in App

MI vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या मोसमातील शुक्रवारी झालेल्या सामन्यात चुरस पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिले. KKRचा निम्मा संघ ६१ धावांत परतल्यानंतर  नवनियुक्त कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी KKRचा डाव सावरला अन् समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, क्विंटन डी' कॉक ( Quinton de Kock) चा झंझावात KKRच्या गोलंदाजांना रोखता आला नाही. रोहित शर्मासह त्यानं रचलेल्या मजबूत पायानंतर मुंबई इंडियन्सला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. या विजयासह मुंबई इंडियन्सनं पुन्हा Point Tableवर अव्वल स्थान गाठले. 

MI vs KKR Latest News & Live Score : 

क्विंटन डी कॉकनं ४४ चेडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या, हार्दिक पांड्यानं ११ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २१ धावा करत मुंबई इंडियन्सला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.

रोहित-क्विंटन यांनी पहिल्या विकेटसाठई ९४ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवचा ( १०) त्रिफळा उडवून वरुण चक्रवर्थीनं KKRच्या आशा पल्लवीत केल्या.  

प्रत्युत्तरात रोहित शर्मा व क्विंटन डी'कॉक यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी संघाला ५.४ षटकांत अर्धशतकी पल्ला गाठून दिला. क्विंटननं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. शिवम मावीनं KKRला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं रोहित शर्माला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककरवी झेलबाद केलं. रोहितनं ३५ धावा केल्या.  

प्रत्युत्तरात रोहित शर्मा व क्विंटन डी'कॉक यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरूवात करून दिली.

नजर हटी, दुर्घटना घटी!; जसप्रीत बुमराहनं चतुराईनं घेतली आंद्रे रसेलची विकेट, Video

ट्रेंट बोल्टची ५० विकेट, सूर्यकुमार यादवचा 'Stunner' कॅच, सारेच अवाक्; Video

नवनियुक्त कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी KKRच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना KKRला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पॅट कमिन्सला मिळालेलं जीवदान MIसाठी महागात पडले. कमिन्सनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ५ बाद ६१ अशा संकटात सापडलेल्या KKRला कमिन्स-मॉर्गन जोडीनं बाहेर काढलं. KKRनं २० षटकांत ५ बाद १४८ धावा केल्या. कमिन्स ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननंही २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. 

नवनियुक्त कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी KKRच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना KKRला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पॅट कमिन्सला मिळालेलं जीवदान MIसाठी महागात पडले.  

किरॉन पोलार्डनं MIच्या गोलंदाजाची हॅटट्रिक होऊ दिली नाही. आंद्रे रसेलला आज मोठी खेळी करण्याची संधी होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही होता, परंतु जसप्रीत बुमराहनं चतुराईनं त्याला ( १२) बाद केलं.

संकटात सापडलेल्या KKRचा पाय राहुल चहरनं ( Rahul Chahar)  आणखी खोलात टाकला. त्यानं शुबमन गिल आणि दिनेश कार्तिक यांना सलग दोन चेंडूंत बाद केले. किरॉन पोलार्डनं MIच्या गोलंदाजाची हॅटट्रिक होऊ दिली नाही.

शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. पण, दोघांची १८ धावांची भागीदारी ट्रेंट बोल्टनं संपुष्टात आणली. पॉईंटवर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Surykumar yadav) स्टनर कॅच घेतला. बोल्टची ही IPLमधील ५०वी विकेट ठरली. पण, कौतुक मात्र यादवचं झालं. नितिश राणाही ( ५) धावांवर कोल्टर नायलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. 

मुंबई इंडियन्स Playing XI: रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर-नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराहकोलकाता नाईट रायडर्स Playing XI: शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, पॅट कमिन्स, प्रसिध कृष्णा, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी

कोलकाता नाईट रायडर्सनं संघात दोन बदल केले आहेत. टॉम बँटन आणि कमलेश नागरकोटी यांच्या जागी अंतिम ११मध्ये ख्रिस ग्रीन व शिवम मावी यांना संधी दिली आहे, तर मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटिन्ससनच्या जागी नॅथन कोल्टर-नायल याची एन्ट्री होणार आहे.  

''दिनेश कार्तिकनं कर्णधारपदावरून पाय उतार होण्याची इच्छा काल व्यक्त केली आणि त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. हा संघासाठी सर्वोत्तम पर्याय असेल, असे त्याला वाटते. तो निस्वार्थी आहे आणि त्यासाठी खूप धाडस लागते. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व माझ्या खांद्यावर सोपवल्याचा आनंद आहे. आता स्पर्धेचा मध्यांतर आला आहे. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघातील ड्रेसिंग रुममध्ये अधिक नेतृत्वगुण असलेले खेळाडू असणे कधीही चांगले. आमच्याकडे असे भरपूर खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात आम्ही काही प्रयोग करणार आहोत. डेथ बॅटिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी हे प्रयोग असतील. आशा करतो की ते यशस्वी होतील,'' असे मॉर्गननं म्हटलं.

दिनेश कार्तिकने सोडलं नेतृत्त्व; आता ‘हा’ खेळाडू बनला केकेआरचा कॅप्टन

आकडेवारी

  • मुंबई इंडियन्सनं या स्टेडियमवर ६ सामन्यांपैकी ४ जिंकले आहेत, तर दोन गमावले आहेत
  • कोलकाता नाईट रायडर्सनं येथे ७ पैकी ४ मध्ये विजय मिळवला आहे, तर तीन सामने गमावले आहेत

आज कोणते विक्रम मोडले जाणार?

  • रोहित शर्मानं आज ५६ धावा करताच मुंबई इंडियन्सकडून IPLमध्ये ४००० धावांचा पल्ला तो गाठेल
  • IPLमध्ये विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ट्रेंट बोल्टला केवळ एका फलंदाजाला माघारी पाठवावं लागेल
  • आंद्रे रसेलला IPLमध्ये १५०० आणि KKRकडून१५०० धावा पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे २९ व ८७ धावा कराव्या लागतील 
  • IPL मध्ये षटकारांचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी इयॉन मॉर्गनला ५ सिक्स खेचावे लागतील 
टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सदिनेश कार्तिक