MI vs KKR : 50th IPL wicket for Trent Boult, Suryakumar yadav has taken an absolute stunner, Video | MI vs KKR Latest News : ट्रेंट बोल्टची ५० विकेट, सूर्यकुमार यादवचा 'Stunner' कॅच, सारेच अवाक्; Video

MI vs KKR Latest News : ट्रेंट बोल्टची ५० विकेट, सूर्यकुमार यादवचा 'Stunner' कॅच, सारेच अवाक्; Video

MI vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या मोसमातील प्ले ऑफच्या चौथ्या स्थानाच्या जवळ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सामना करण्यापूर्वी कर्णधार बदलण्याचा डाव खेळला. दिनेश कार्तिकनं ( Dinesh Karthik) फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी KKRच्या नेतृत्वाची जबाबदाली इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्याकडे सोपवली. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली KKR पहिलाच सामना MI विरुद्ध आज अबु धाबी येथे खेळणार आहे.  कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स लक्ष्याचा पाठलाग करणार आहे. MI vs KKR Latest News & Live Score : 

  • मुंबई इंडियन्स Playing XI: रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर-नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
  • कोलकाता नाईट रायडर्स Playing XI: शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, पॅट कमिन्स, प्रसिध कृष्णा, शिवम मावी, वरुण चक्रवर्थी


दिनेश कार्तिकनं कर्णधारपद का सोडलं?
''दिनेश कार्तिकनं कर्णधारपदावरून पाय उतार होण्याची इच्छा काल व्यक्त केली आणि त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. हा संघासाठी सर्वोत्तम पर्याय असेल, असे त्याला वाटते. तो निस्वार्थी आहे आणि त्यासाठी खूप धाडस लागते. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व माझ्या खांद्यावर सोपवल्याचा आनंद आहे. आता स्पर्धेचा मध्यांतर आला आहे. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघातील ड्रेसिंग रुममध्ये अधिक नेतृत्वगुण असलेले खेळाडू असणे कधीही चांगले. आमच्याकडे असे भरपूर खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात आम्ही काही प्रयोग करणार आहोत. डेथ बॅटिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी हे प्रयोग असतील. आशा करतो की ते यशस्वी होतील,'' असे मॉर्गननं म्हटलं. MI vs KKR Latest News & Live Score : 

शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. पण, दोघांची १८ धावांची भागीदारी ट्रेंट बोल्टनं संपुष्टात आणली. पॉईंटवर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Surykumar yadav) स्टनर कॅच घेतला. बोल्टची ही IPLमधील ५०वी विकेट ठरली. पण, कौतुक मात्र यादवचं झालं.
 

पाहा कॅच..

IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे परदेशी गोलंदाज ( Most wkts by an overseas pace/Medium fast bowler in IPL)
लसिथ मलिंगा -१७०
ड्वेन ब्राव्हो - १५२ 
डेल स्टेन - ९७
शेन वॉटसन - ९२ 
अॅल्बी मॉर्केल - ८५
मॉर्नी मॉर्केल - ७७
ख्रिस मॉरिस - ७४
मिचेल मॅक्लेघन - ७१ 
जॅक कॅलिस - ६५
मिचेल जॉन्सन/आंद्रे रसेल - ६१ 
जेम्स फॉल्कनर - ५९
किरॉन पोलार्ड - ५८ 
ट्रेंट बोल्ट - ५०

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs KKR : 50th IPL wicket for Trent Boult, Suryakumar yadav has taken an absolute stunner, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.