Join us  

MI vs KKR Latest News : रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

MI vs KKR Latest News : या सामन्यात रोहित शर्मानं ( Rohit Sharma) तुफान खेळ करताना IPLमध्ये विक्रमाला गवसणी घातली. डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला. त्यानं 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 8:38 PM

Open in App

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत सुरूवातीपासून आघाडीवर होता. तगड्या फलंदाजांची फौज, सर्वोत्तम अष्टपैलू आणि भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांचा तोफखाना असलेला MI पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्धच्या आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष त्यांच्या विजयाकडे लागले आहेत. KKR विरुद्ध मागील पाच सामन्यातं MIने चार विजय मिळवले आहेत. (MI vs KKR Latest News & Live Score)

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल

कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मात्र आधीच्या चार सामन्यांपैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या  संघानेच जिंकला आहे.  या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला ( Kieron Pollard ) सामन्यापूर्वी 150 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. मुंबई इंडियन्सकडून 150वा आयपीएल सामना खेळणारा पोलार्ड हा पहिलाच खेळाडू आहे. पोलार्डनं 150 IPL सामन्यांत 2773 धावा केल्या आहेत. त्यात 14 अर्धशतकांचा समावेश असून 83 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. शिवाय पोलार्डने 56 विकेट्सही घेतल्या आहेत.  मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MIच्या डावाला आकार दिला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितनं मारलेला षटकार लाजवाब होता. IPL 2020 Auctionमधील सर्वात महागडा गोलंदाज पॅट कमिन्सच्या षटकात रोहितनं दोन खणखणीत Six मारले. रोहित-सुर्यानं अर्धशतकी भागीदारी करताना संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 59 धावा करून दिल्या.

आयपीएलमध्ये रोहित शर्माने KKRविरुध्द 850+ धावा केल्या आहेत. एखाद्या फलंदाजाने आयपीएलच्या एकाच संघाविरुध्द केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. 

प्रत्येक संघाविरुद्ध कुणी सर्वाधिक धावा केल्यात?865* - रोहित शर्मा वि. कोलकाता नाइट रायडर्स829 - डेव्हिड वॉर्नर वि.  कोलकाता नाइट रायडर्स825 - विराट कोहली वि. दिल्ली कॅपिटल्स819 - डेव्हिड वॉर्नर वि. किंग्स इलेव्हन पंजाब818 - सुरेश रैना वि. कोलकाता नाइट रायडर्स818- सुरेश रैना वि. मुंबई इंडियन्स814- सुरेश रैना वि. किंग्स इलेव्हन पंजाब   

टॅग्स :IPL 2020रोहित शर्माडेव्हिड वॉर्नरमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स