Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, 2nd Match : मुंबईतील वानखेडेच्या मैदानातून मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात करत आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर हार्दिक पांड्यासह केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं या सामन्यात पाच फलंदाज आणि सहा गोलंदाज या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI नं क्विंटन डिकॉला बसवलं बाकावर, KKR कडून दोघांना पदार्पणाची संधी
मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल २०२६ च्या हंगामातील सलामीच्या लढतीत रोहितच्या साथीला रायन रिकल्टनला पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे क्विंटन डीकॉकला बाकावर बसावे लागणार आहे. एवढेच नाही तर MI च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव दिसत नाही. पण त्याचे नाव इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत आहे. त्यामुळे फलंदाजीवेळी तो सक्रीय होईल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे कोलकाताच्या संघाकडून न्यूझीलंडचा आक्रमक बॅटर फिन ॲलन आणि झिम्बाब्वेचा जलदगती गोलंदाज ब्लेसिंग मुजराबानी यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
KKR 'हलवा बदाम' टीम! MI चा राजा रोहित शर्मा त्यांचा बाजा वाजवणार? माजी दिग्गज म्हणाला...
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा, रायन रिकल्टन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
MI इम्पॅक्ट प्लेयर - सूर्यकुमार यादव, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिन्झ, राज बावा, अश्वनी कुमार
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन
फिन ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरुन ग्रीन, अंगकृष्ण रघुवंशी (यष्टीरक्षक ), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुजराबानी.
KKR इम्पॅक्ट प्लेयर: मनीष पांडे, रोवमन पॉवेल, कार्तिक त्यागी, सौरभ दुबे, तेजस्वी दहिया