Join us

Rohit Sharma on Pat Cummins, MI vs KKR IPL 2022 Live Updates : एवढं पण कोण हाणतं का?; पॅट कमिन्सची आतषबाजी पाहून रोहित शर्मा हतबल, म्हणाला..., Video

आयपीएल २०२२मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या पॅट कमिन्सने ( Pat Cummins) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 00:00 IST

Open in App

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : आयपीएल २०२२मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या पॅट कमिन्सने ( Pat Cummins) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. मुंबई इंडियन्सच्या १६१ धावा या कोलकाता नाईट रायडर्सना पार करणे तितकसं अवघड नव्हते. पण, पटापट विकेट गेल्याने त्यांच्यावर दडपण वाढले होते. मात्र, पॅट कमिन्स आला अन् खणखणीत फटकेबाजी करून गेला. ३० चेंडूंत करायच्या ३५ धावा त्याने ६ चेंडूंतच केल्या आणि कोलकाताला ५ विकेट्स व २४ चेंडू राखून विजय मिळवून दिला. 

रोहित शर्मा फलंदाजीत अपयशी ठरला. तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ४९ चेंडूंत ८३ धावा चोपल्या. पदार्पणवीर डेवॉल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. इशान किशनला ( १४) पॅट कमिन्सने बाद केले.  सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला.  किरॉन पोलार्डने त्यानंतर त्या षटकात तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पोलार्ड ५ चेंडूंत ३ षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला.   

प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणे व वेंकटेश अय्यरने सावध सुरुवात केली. पण, कोलकाताचा निम्मा संघ १०१ धावांवर तंबूत परतला होता. अजिंक्य ( ७), श्रेयस अय्यर ( १०), सॅम बिलिंग्स ( १७), आंद्रे रसेल ( ११) व नितिश राणा ( ८) हे माघारी परतले. मात्र, १६व्या षटकात कमिन्सने कहरच केला. टायमल मिल्सच्या त्या षटकात त्याने ६, ४, ६, ६, ३nb, ४, ६ खेचून कोलकाताला विजय मिळवून दिला. कमिन्स १५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ५६ धावांवर नाबाद राहिला. वेंकटेश ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५० धावांवर नाबाद राहिला. KKR ने १६ चेंडूंत ५ बाद १६२ धावा करून सामना जिंकला. 

रोहित काय म्हणाला?''तो येईल आणि अशी फटकेबाजी करेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. आज तो ज्या प्रकारे खेळला, त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे. आम्ही फलंदाजीची सुरूवात चांगली केली नाही. तरीही अखेरच्या चार षटकांत चांगला खेळ करून आम्ही १६०+ धावा करण्यात यशस्वी झालो. १५व्या षटकापर्यंत सामना आमच्या हातात होता, परंतु ज्या प्रकारे कमिन्स खेळलाय, त्याला तोडच नाही. आम्हाला वाटले आम्ही आता सामना जिंकू, परंतु कमिन्सची फटकेबाजी पचवणे अवघड आहे. त्याने संपूर्ण सामनाच फिरवला. आता आणखी मेहनत घेण्याची आम्हाला गरज आहे,''असे रोहित म्हणाला.   पाहा व्हिडीओ..

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App