Join us

Kieron Pollard  MI vs KKR IPL 2022 Live Updates : २, ६, २, ६, ६; किरॉन पोलार्ड पेटला... ५ चेंडूंत २२ धावा कुटून पॅट कमिन्सच्या चेहऱ्याचा रंग उडवला, Video 

कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिली करून मुंबई इंडियन्सला ५५ धावांवर ३ धक्के दिले होते. पण,

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 21:43 IST

Open in App

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिली करून मुंबई इंडियन्सला ५५ धावांवर ३ धक्के दिले होते. पण, अजिंक्य रहाणेने कॅच सोडून जीवदान दिलेल्या तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ४९ चेंडूंत ८३ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्स जेमतेम समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारतील असे वाटले होते. पण, किरॉन पोलार्डने ५ चेंडूंत सामना फिरवला. त्याने पॅट कमिन्सने टाकलेल्या २०व्या षटकात ५ चेंडूंत २२ धावा चोपल्या आणि मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यातील हे सर्वात महागडे षटक ठरले.  Kieron Pollard goes hammer and tongs with 22* from just 5 balls

फॉर्मात असलेल्या उमेश यादवने अपेक्षित सुरुवात करून दिली आणि त्याच्या मदतीला रसिख होताच... उमेशने तिसऱ्या षटकात चतुराईने रोहित शर्माची विकेट घेतली. पदार्पणवीर डेवॉल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूंत २९ धावांची खेळी केली.  इशान किशनला ( १४) पॅट कमिन्सने बाद केले.  १३व्या षटकात तिलक वर्माला जीवदान मिळाले. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर बाद झाला. किरॉन पोलार्डने त्यानंतर त्या षटकात तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ४ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारून दिली. तिलक वर्मा २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला. पोलार्ड ५ चेंडूंत ३ षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला. 

पाहा व्हिडीओ...आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ ( ५०) पोलार्डचा  (३३) क्रमांक येतो. २०व्या षटकात पोलार्ड ४०४ धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने ६२७ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२२किरॉन पोलार्डमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App