MI vs KKR : हिटमॅन रोहित शर्माचा धमाका! IPL कारकिर्दीतील जलद अर्धशतकासह साधला मोठा डाव

पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी; हिटमॅन रोहित शर्मानं अवघ्या २३ चेंडूत साजरे केले अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 22:16 IST2026-03-29T22:15:04+5:302026-03-29T22:16:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MI vs KKR Fifty For Rohit Sharma From Just 23 Balls He Becomes Highest Run Getter vs KKR In IPL History | MI vs KKR : हिटमॅन रोहित शर्माचा धमाका! IPL कारकिर्दीतील जलद अर्धशतकासह साधला मोठा डाव

MI vs KKR : हिटमॅन रोहित शर्माचा धमाका! IPL कारकिर्दीतील जलद अर्धशतकासह साधला मोठा डाव

MI vs KKR Rohit Sharma Set New Record : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात कोलकाताच्या संघाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मानं दमदार फटकेबाजीचा नजराणा पेश केला. पॉवर प्लेमध्ये आपल्या फलंदाजीतील ताकद दाखवून देताना हिटमॅन रोहित शर्मानं अवघ्या २३ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतल सर्वात जलद अर्धशतक ठरले. याशिवाय त्याने या सामन्यात  कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, रोहित शर्मानं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विरुद्ध आयपीएलमधील ३६ सामन्यांत ३८ च्या सरासरी आणि १२७ च्या स्ट्राइक रेटसह  १०९४ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात ६ अर्धशतकासह रोहितनं एक शतक झळकावल्याचा रेकॉर्डही आहे. कोलकाता विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत याआधी डेविड वॉर्नर आघाडीवर होता. त्याला मागे टाकत हिटमॅन आता नंबर वनवर पोहचला आहे. या दोघांशिवाय विराट कोहली हा एकमेव असा फलंदाज आहे ज्याने आयपीएलमध्ये कोलकाता फ्रँचायझीविरुद्ध १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

Web Title : रोहित शर्मा का धमाका: केकेआर के खिलाफ सबसे तेज़ आईपीएल अर्धशतक!

Web Summary : रोहित शर्मा ने वानखेड़े में केकेआर के खिलाफ सिर्फ 23 गेंदों में रिकॉर्ड तोड़ अर्धशतक बनाया, अपनी पावर-हिटिंग का प्रदर्शन किया। उन्होंने डेविड वार्नर को पीछे छोड़ते हुए आईपीएल इतिहास में कोलकाता नाइट राइडर्स के खिलाफ सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज बन गए, जिनमें एक शतक सहित 1094 से अधिक रन हैं।

Web Title : Rohit Sharma's Blazing Knock: Fastest IPL Fifty Against KKR!

Web Summary : Rohit Sharma smashed a record-breaking fifty in just 23 balls against KKR at Wankhede, showcasing his power-hitting. He surpassed David Warner to become the highest run-scorer against Kolkata Knight Riders in IPL history, with over 1094 runs including a century.