Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २५ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या 'ऑल राउंडर'ला MI विरुद्ध बॉलिंगच दिली नाही! अजिंक्य रहाणेच्या उत्तराने भुवया उंचवल्या...

मागील ८ सामन्यात त्याने फक्त ४३ चेंडूच फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:11 IST

Open in App

Ajinkya Rahanes Blunt Remark On Cameron Green Bowling Absence  : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात IPL स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात १३ वर्षांची पराभवाची मालिका खंडीत करत मुंबई इंडियन्सने दिमाखदार विजय नोंदवला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

२५ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या 'ऑल राउंडर'ला MI विरुद्ध बॉलिंगच दिली नाही 

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिष रघुवंशीच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्ससमोर २२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने IPL च्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून दाखवत इतिहास रचला. कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवापेक्षा या सामन्यानंतर २५.२० कोटी मोजलेल्या ऑस्ट्रेलियन ऑलराउंडरची चर्चा रंगताना दिसत आहे. कारण धावांचा बचाव करताना कॅमरुन ग्रीन याने गोलंदाजीच केली नाही. मॅचनंतर ज्यावेळी अजिंक्य रहाणेला यासंदर्भात प्रश्न विचाण्यात आला त्यावेळी त्याने दिलेले उत्तर सर्वांच्या भुवया उंचवणारे होते. अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर

वयाच्या ११ व्या वर्षी घर सोडलं! Angkrish Raghuvanshi चा मुंबई ते कोलकाता प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

त्याला बॉलिंग का दिली नाही? अजिंक्य रहाणेच्या उत्तराने भुवया उंचवल्या

आयपीएल २०२६ साठी झालेल्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून ग्रीन याला २५.२० कोटी एवढी तगडी रक्कम मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. महागडा गडी फलंदाजीत फ्लॉप ठरल्यावर तो गोलंदाजीसाठी संघाला उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा होती. पण MI विरुद्ध त्याने गोलंदाजीच केली नाही. सामन्यानंतर अजिंक्य रहाणेला त्याला गोलंदाजी का दिली नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजिंक्य रहाणे म्हणाला की, याच उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच देऊ शकते.  "मला वाटतं की ग्रीन लवकरच गोलंदाजी करू शकेल. त्यानंतर गोलंदाजीत संतुलन पाहायला मिळेल. तोपर्यंत आमच्यासाठी गोलंदाजीत कोण उत्तम करू कामगिरी करू शकते याच संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहोत."

मागील ८ सामन्यात फक्त ४३ चेंडू फेकले

कॅमरून ग्रीन हा दुखापतीतून सावरुन मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याला फक्त फलंदाजी करण्याच्या अटींवर IPL मध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे का? अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, कॅमरुन ग्रीन याने मागील ८ सामन्यात फक्त ७.१ षटके गोलंदाजी केली आहे. आयपीएलमध्ये खेळण्याआधी तो ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शील्ड स्पर्धेत खेळताना दिसला होता. पण या स्पर्धेतही त्याने गोलंदाजी केली नव्हती. जर तो IPL मध्येही तेच करणार असेल तर कोलकाता नाईट रायडर्सचा २५ कोटी वाया जाण्याचीच अधिक शक्यता वाटते. 

English
हिंदी सारांश
Web Title : KKR's Green Benched from Bowling: Rahane's Reply Raises Eyebrows

Web Summary : KKR's expensive all-rounder, Cameron Green, didn't bowl against MI, sparking questions. Captain Rahane's response, suggesting Cricket Australia holds the answer, surprised many. Green's limited bowling post-injury raises concerns about KKR's investment.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्समुंबई इंडियन्सअजिंक्य रहाणे