Join us

MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव

मोहम्मद सिराज हा यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 20:18 IST

Open in App

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात घरच्या मैदानात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजनंगुजरात टायटन्सच्या संघाला जबरदस्त सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले. MI च्या ताफ्यातील सलामीवीर रायन रिकल्टन याला सिराजनं पहिल्याच षटकात साई सुदर्शन करवी झेलबाद केले. डावातील पहिल्या चेंडूवर दोन धावा करुन दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. या विकेट्ससह सिराजने यंदाच्या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पॉवर प्लेमध्ये सिराजचा धाक 

मोहम्मद सिराज हा यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. रायन रिकल्टनच्या रुपात पहिल्याच षटकात पहिली विकेट ११ व्या सामन्यात त्याने पॉवरप्लेमध्ये आपल्या खात्यात ९ व्या विकेट्सची नोंद केली. आतापर्यंत त्याने १५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 

"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

IPL २०२५ च्या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मोहम्मद सिराज (गुजरात टायटन्स) ९ विकेट्स
  • खलील अहमद (चेन्नई सुपर किंग्ज) ९ विकेट्स
  • अर्शदीप सिंग (पंजाब किंग्ज) ९ विकेट्स
  • जोश हेजलवूड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) ७ विकेट्स
  • दीपक चाहर (मुंबई इंडियन्स) ७ विकेट्स
  • पॅट कमिन्स (सनरायझर्स हैदराबाद) ७ विकेट्स 
टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्समोहम्मद सिराज