Join us

MI vs GT, IPL 2023 Live Score: एकच वादा सुर्या दादा..! सुर्यकुमारचे पहिले शतक, मुंबईचे गुजरातला 219 धावांचे आव्हान...

MI vs GT, IPL 2023 Live : सुर्यकुमार यादवने IPL करिअरचे पहिले शतक झळकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 21:35 IST

Open in App

MI vs GT, IPL 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 57 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. आज परत एकदा मुंबईच्या सुर्यकुमारने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. सुर्याने IPL 2023 चे पहिले शतक झळकावले आहे. सुर्याने अवघ्या 49 बॉलमध्ये 103 धावा काढल्या. त्याच्याया धावांच्या जोरावर मुंबईने गुजरातला 219 धावांचे टार्गेट दिले आहे.

टॉस जिंकून गुजरातने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मैदानात उतरलेल्या मुंबईच्या सलामीवीरांनी संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेमध्ये रोहित आणि इशानने 61 धावा काढल्या. या जोडीला राशिद खानच्या फिरकीने तोडले. यानंतर सुर्यकुमारने विष्णू विनोदसोहत मुंबईला पुढे नेले. चौकार आणि षटकारांच्या जोरावर सुर्यकुमारने IPL 2023 चे पहिले शतक झळकावले.

राशीदने 4 बळी घेतले

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या गुजरात टायटन्सला पॉवरप्लेमध्ये एकही बळी घेता आला नाही. मात्र 7व्या षटकात राशिद खानने संघाला दोन विकेट मिळवून दिल्या. त्याने डावाच्या 7व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनला आउट केले. यानंतर नेहल वढेरा आणि टीम टेव्हिडलाही त्याने माघारी पाठवले.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्सरोहित शर्मा
Open in App