Join us  

मुंबई इंडियन्सची विजयाची टक्केवारी लय भारी; IPL मध्ये असा पराक्रम अन्य संघांना जमलाच नाही!

MI vs DC Latest News : मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) ५ विकेट्स व २ चेंडू राखून सामना जिंकताना Point Tableवर अव्वल स्थान पटकावलं.

By स्वदेश घाणेकर | Published: October 12, 2020 8:00 AM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) रविवारी दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) ५ विकेट्स व २ चेंडू राखून सामना जिंकताना Point Tableवर अव्वल स्थान पटकावलं. मुंबई ( MI) आणि दिल्ली ( DC) यांच्या खात्यात प्रत्येकी १० गुण आहेत, परंतु MI १.३२७ अशा रनरेटनं अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत एकाही संघाला न जमलेला विक्रम नावावर केला. त्या विक्रमानुसार IPLमध्ये मुंबई इंडियन्स सर्वांवर भारी पडल्याचे दिसत आहे. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिट्लसनं आजच्या संघात दोन बदल केले होते. त्यांनी अजिंक्य रहाणे व अॅलेक्स केरी यांना स्थान देताना रिषभ पंत व अँड्य्रू टे यांना विश्रांती दिली होती. पण, अजिंक्यला मोठी खेळी करण्यात अपयश आले. शिखर धवन ( ६९) आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( ४२) यांनी खिंड लढवताना दिल्लीला २० षटकांत ४ बाद १६२ धावांचा पल्ला गाठून दिला. 

प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ५) लगेच माघारी परतला तरी क्विंटन डी'कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दिल्लीच्या गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. आर अश्विननं ही भागीदारी तोडली. क्विंटन ३६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. यादवने ३२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावा केल्या.  इशान किशनने १५ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांची खेळी केली. त्यांच्यामुळे मुंबईने ५ विकेट्स राखून सामना जिंकला.

या विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,''ज्या प्रकारे आम्ही क्रिकेट खेळत आहोत, त्यानं पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास मिळत आहे. स्पर्धेच्या पहिल्या हाफमधील उल्लेखनीय कामगिरी पाहून आनंद झाला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी परफेक्ट होता. सर्व आघाड्यांवर आम्ही चांगली कामगिरी केली.''  

मुंबई इंडियन्सनं या विजयाबरोबर IPL मधील अन्य संघांविरुद्ध विजयाची टक्केवारी ५० पेक्षा वर ठेवण्याचा पराक्रम केला. सर्व संघांविरुद्ध ५० टक्क्यांपेक्षा अधिक सामने जिंकणारा मुबंई इंडियन्स हा एकमेव संघ आहे.

मुंबईची अन्य संघांविरुद्ध कामगिरी ( टक्केवारीत) वि. कोलकाता नाइट रायडर्स - ७६. ९२%वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ६१.५३%वि. चेन्नई सुपर किंग्स - ५८.६२%वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ५६%वि. सनरायझर्स हैदराबाद - ५३.३३%वि. राजस्थान रॉयल्स - ५२.३८%वि. दिल्ली कॅपिटल्स - ५२%  

मुंबई इंडियन्सचा अन्य संघांविरुद्ध जय/पराजयाची आकडेवारीदिल्ली कॅपिटल्स- १३/१२चेन्नई सुपर किंग्स - १७/१२किंग्स इलेव्हन पंजाब- १४/११कोलकाता नाइट रायडर्स - २०/६राजस्थान रॉयल्स - ११/१०रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १६/९सनरायझर्स हैदराबाद - ८/७ 

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सकिंग्स इलेव्हन पंजाबकोलकाता नाईट रायडर्स