मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करताना इम्पॅक्ट प्लेयरचा खरा तोरा रोहित शर्मानं अखेर दाखवून दिला. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दिलेल्या १७७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या भात्यातून ३३ चेंडूत अर्धशतकी खेळी आली. आयपीएलमधील ४४ वे आणि यंदाच्या हंगामातील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मानं साधला मोठा डाव, किंग कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याआधी पहिल्या सहा डावात रोहितच्या खात्यात फक्त ८२ धावा होत्या. यात सनरायझर्स विरुद्धच्यासामन्यात त्याने १६ चेंडूत केलेल्या २६ धावांच्या खेळीचा समावेश होता. यंदाच्या हंगामातील पहिल्या अर्धशतकासह रोहित शर्मानं किंग कोहलीची बरोबरी केली आहे. CSK विरुद्ध त्याने नवव्यांदा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम नोंदवला. ज्यात एका शतकाचाही समावेश आहे.
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
एका डावात तिघांना गाठलं
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने फक्त कोहलीसह तिघांना गाठलं. रोहित आणि विराट कोहलीशिवाय चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शिखर धवन आणि डेविड वॉर्नर यांनीही प्रत्येकी ९ वेळा ५० प्लस धावसंख्या केल्याचा रेकॉर्ड आहे.