सॅम कुरनने अर्धशतक करत अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि चेन्नईला शतकीपार धावसंख्या गाठुन दिली आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाला आपल्या २०० व्या सामन्यात किमान समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले आहे. असे असले तरी या आधी चेन्नईच्या संघाची निचांकी कामगिरी ही ७९ धावांची होती. तीही मुंबईच्याच विरोधात दुसºया डावात खेळताना त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यावेळी अंबाती रायुडूहा मुंबईच्या संघात होता. तर पहिल्या डावात खेळताना सीएसकेची निचांकी कामगिरी ही १०९ धावांची आहे. राजस्थान विरोधात खेळताना त्यांनी ही कामगिरी केली होती. या दोन्ही सामन्यात सीएसकेला पराभव स्विकारावा लागला होता. आजच्या सामन्यात रुतुराज गायकवाड आणि एन.जगदीशन यांना संधी मिळाली मात्र दोघांनाही संधीचे सोने करता आले आहे. 
सीएसकेची निचांकी कामगिरी
दुसºया डावात
७९ सीएसके वि. मुंबई इंडियन्स, मुंबई २०१३
पहिल्या डावात
१०९ सीएसके वि. राजस्थान रॉयल्स
जयपूर २००८
सर्वाधिक टी २० सामने खेळलेले आयपीएल संघ
मुंबई इंडियन्स २१९
आरसीबी २०६
कोलकाता नाईट रायडर २०४
चेन्नई सुपर किंग्ज २००
दिल्ली कॅपिटल्स १९५
किंग्ज इलेव्हन पंजाब १९१
राजस्थान रॉयल्स १६५
सनरायजर्स हौदराबाद १२४