MI Owner Akash Ambani vs Kavya Maran Bid War In IPL IPL Auction 2026 : परदेशात रंगलेल्या IPL २०२६ च्या मिनी लिलावाच्या खेळात अनकॅप्ड भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. ३० लाख मूळ किंमत असलेले अनेक खेळाडूंना फ्रँचायझी संघांनी 'करोडपती' केले. अनकॅप्ड खेळाडूंवर मोठी बोली लावण्यात CSK चा संघ आघाडीवर राहिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् ऑक्शन टेबलवर रंगला आकाश अंबानी विरुद्ध काव्या मारन यांच्यात सामना
दुसऱ्या बाजूला पर्समध्ये मोजकी रक्कम असतानाही मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघानं आवाक्या बाहेर असलेल्या कॅमरून ग्रीनवरही बोली लावण्याचा खेळ खेळला. काही खेळाडू MI च्या हाती लागले नाहीत. पण आकाश अंबानींच्या खास अंदाजाने सर्वांचे लक्षवेधून घेतले. याशिवाय आकाश अंबानी आणि SRH ची मालकीण काव्या मारन याच्यात एका अनकॅप्ड खेळाडूंसाठी चांगलीच जुलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. कोण आहे तो खेळाडू अन् शेवटी कुणी मारली बाजी? जाणून घेऊयात सविस्तर
CSK चा डबल धमाका! रणनिती बदलून अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा
कोण आहे तो खेळाडू? अन् कोणी मारली फायनल बाजी?
पंजाबचा विकेट किपर बॅटर सलील आरोरा आयपीएलच्या लिलावात ३० लाख एवढ्या मूळ किंमतीसह सहभागी झाला होता. त्याला संघात घेण्यासाठी आकाश अंबानी आणि काव्या मारन यांच्यात बोली युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्यात रंगलेल्या सामन्यामुळे पंबाजी मुंडा करोडपती झाला. ३० लाखांच्या खेळाडूला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने १ कोटी २० लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. ही बाजी आपण जिंकली, यावर काव्या मारनला विश्वासच बसेना. त्यामुळे हा खेळाडू संघात आल्यावर तिच्या चेहऱ्यावरील भाव बघण्याजोगा होता.
ते एक शतक अन् पंजाबी क्रिकेटर झाला 'करोडपती'
पंजाबी विकेट किपर बॅटरनं IPL लिलावाआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाबकडून खेळताना आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवून दिली होती. पुण्यातील अंबी येथील डीवाय पाटील अकादमीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात झारखंड विरुद्धच्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत शतक झळकावले होते. त्याची ही खेळी त्याला करोडपती करण्यात महत्त्वपूर्ण ठरली.