Join us

MI officially out of the IPL 2021: गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात; क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर लढतीत कोणते संघ भिडणार, याचे चित्र झाले स्पष्ट!

MI officially out of the IPL 2021 - गतविजेत्या मुंबई इंडियन्सनचे जेतेपदाची हॅटट्रिक मारण्याचे स्वप्न अखेर संपुष्टात आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 22:27 IST

Open in App

MI officially out of the IPL 2021 - गतविजेत्या मुंबई इंडियन्सनचे जेतेपदाची हॅटट्रिक मारण्याचे स्वप्न अखेर संपुष्टात आले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात MI नं ९ बाद २३५ धावांचा डोंगर उभा केला, पण SRHनं केवळ ६४ धावा करून त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले. आज मुंबईनं ९ बाद २३५ धावा केल्यामुळे त्यांना सनरायझर्स हैदराबादला ६४ धावांवर गुंडाळावे लागणार होते, पण त्यांना तसे करता आले नाही.  ६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेसन रॉयनं मारलेल्या चौकारानं गतविजेत्यांना स्पर्धेतून बाहेर केले. 

मुंबई इंडियन्सला हा सामना १७१+ धावांनी जिंकायचा होता, पण आता ते शक्य नाही. हैदराबादनं ६४ धावा पार करताच मुंबई इंडियन्स बाहेर गेले. त्यामुळे १४ गुण व ०.५८७ नेट रन रेट असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सनं चौथ्या स्थानासह प्ले ऑफमधील स्थान पक्क केलं. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताच त्याचा टॉप टू मध्ये जाण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे आता RCBला एलिमिनेटरमध्ये KKR चा सामना करावा लागेल. दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स हे क्वालिफायर १ खेळतील.

मुंबईची गाडी सुसाट, पण...  गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या नेत्रदिपक फटक्यांनी MI च्या चाहत्यांना खूश केलं. कर्णधार रोहित शर्मा ( १८) माघारी परतल्यानंतरही इशानची फटकेबाजी सुरूच होती. त्यानं १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि हे मुंबई इंडियन्सडून झालेलं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. त्यानंतर त्यानं ३२ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ८४ धावा कुटल्या. हार्दिक पांड्याला ( १०) बढती मिळाली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. किरॉन पोलार्ड ( १३) अपयशी ठरला. त्यानंतर सूर्यकुमार यादवनं ४० चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा करताना मुंबईला ९ बाद २३५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App