Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 12:44 IST

Open in App

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का दिला आहे. 'काय पो छे' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'एमएस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं सर्वांना कौतुक केलं. पण, सुशांतचं असं जाणारं सर्वांना चटका लावणारे ठरले. मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूनं सुशांतसोबत काय पो छे चित्रपटात काम केलं होतं आणि त्यात सुशांत क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. सुशांतच्या निधनानंतर मुंबई इंडियन्सनं गुरुवारी भावनिक पोस्ट केली. त्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं सुशांतला दिलेलं वचन अपूर्णच राहणार अशी खंत व्यक्त केली.

दिग्विजय देशमुख असं या खेळाडूचे नाव आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगच्या 13 व्या मोसमासाठी त्याला मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले होते. कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. चांगल्या दर्जाचा क्रिकेटपटू बनेपर्यंत सुशांतला न भेटण्याचं वचन दिग्विजनं दिलं होतं. पण, आता सुशांतच्या जाण्यानं ते वचन अपूर्णच राहणार आहे. 

दिग्विजयनं सांगितलं की,''त्याला क्रिकेटची भारी आवड होती. काय पो छेच्या शूटच्या अखेरच्या दिवशी मी त्याला वचन दिलं होतं. जो पर्यंत चांगल्या स्तरावर क्रिकेट खेळायला सुरूवात करत नाही, तो पर्यंत तुला भेटणार नाही. यावर्षी मी मुंबई इंडियन्सकडून खेळणार होतो आणि मी त्याला भेटण्याचे ठरवले होते.  पण, लॉकडाऊन जाहीर झाला आणि आता त्यानंच जग सोडलं.''

''वचन दिल्यामुळे मी त्याला इतकी वर्ष भेटलो नाही. त्याचे दुःख मनात कायम राहील. मी त्यावेळी 15 वर्षांचा होतो आणि सहा महिने त्याच्यासोबत शूटींग केलं. शूटींग संपल्यानंतर त्यानं मला घरी बोलावलं आणि कॅमेराला कसं सामोरे जायचे हे शिकवले होते,''असे दिग्विजयने सांगितले. मुंबई इंडियन्सनं गुरूवारी दिग्विजय याच्या भावनांना सोशल मीडियावर पोस्ट लिहून वाट मोकळी करून दिली. ''काय पो छे मधला 'अली' जेव्हा मैदानावर उतरेल, तेव्हा त्याचा गुरू 'इशान' स्वर्गातून ते चित्र पाहून आनंदी होईल,''असे मुंबई इंडियन्सनं ट्विट केलं.  

दिग्विजय महाराष्ट्रा संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानं 1 प्रथम श्रेणी क्रिकेट आणि 7 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले आहेत.   

भारतीयांवर भडकली 'पॉर्न स्टार' रेनी ग्रेसी; दिली कायदेशीर कारवाईची धमकी!  

माझं घरच तू होतीस गं... आईच्या निधनानंतर SRHच्या क्रिकेटपटूला दुःख अनावर

टॅग्स :मुंबई इंडियन्ससुशांत सिंग रजपूत