Join us

#MeToo: सौरव गांगुलीने बीसीसीआयचे कान टोचले, चाहत्यांमधला अविश्वास वाढतोय

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) चांगलेच कान टोचले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 08:49 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) चांगलेच कान टोचले आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत आणि प्रशासकीय समिती ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहे, त्यावर गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे. गांगुलीने याबाबत बीसीसीआयला एक खरमरीत पत्र पाठवले आहे.

गांगुलीने कोणाचेही नाव न घेता लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत चिंता व्यक्त केली. त्याने प्रशासकीय समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला,'' लैगिंक अत्याचाराच्या आरोपात किती तथ्य आहे, हे मला माहित नाही. मात्र, हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे, त्याने बीसीसीआयची प्रतिमा मलीन होत आहे.  

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय