Join us

#MeToo : लसिथ मलिंगावर भारताच्या गायिकेने केला विनयभंगाचा आरोप

एका दिग्गज खेळाडूवरही विनयभंगाचे आरोप एका भारतीय गायिकेने केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 16:52 IST

Open in App
ठळक मुद्देश्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यावर एका एअर होस्टेसने विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा हा  खेळाडू दुसरा क्रिकेचपटू ठरला आहे. 

मुंबई : क्रिकेट विश्वालाही आता 'मीटू'चा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काही बॉलीवूडमधील मंडळींची नावं यामध्ये आली होती. पण आता आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघातील एका दिग्गज खेळाडूवरही विनयभंगाचे आरोप एका भारतीय गायिकेने केले आहेत. हा खेळाडू आहे लसिथ मलिंगा. मलिंगावर चिन्मयीने विनयभंगाचा आरोप केला आहे. याबाबत मुंबई इंडियन्स किंवा मलिंगा यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यावर एका एअर होस्टेसने विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर मलिंगा आता विनयभंगाचा आरोप झालेला दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. 

भारतातील गायिका चिन्मयी श्रीपादने एका क्रिकेटपटूवर विनयभंगाचा आरोप केला आहे. याबाबत चिन्मयी म्हणाली की, " एका क्रिकेटपटूने मला हॉटेलच्या रुममध्ये नेले आणि त्याने माझा विनयभंग केला. त्यानंतर हॉटेलच्या स्टाफने मला त्या खेळाडूच्या तावडीतून सोडवले. "

चिन्मयीने केलेले हे ट्विट पाहा...

टॅग्स :मीटूलसिथ मलिंगाश्रीलंकाआयपीएलमुंबई इंडियन्स