Join us

मॅथ्यू हेडनचं डोक फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...

नेमक काय म्हणाला हेडन? त्यावर लेक ग्रेस हिची काय आली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 22:44 IST

Open in App

Matthew Hayden’s Daughter Grace Makes Comic Appeal To Joe Root : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस २०२५ या मालिकेआधी मॅथ्यू हेडन याने इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुटसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटरच्या बोल्ड वक्तव्यानंतर त्याची लेक आणि क्रिकेटच्या मैदानात स्पोर्ट्स अँकरच्या रुपात 'बोलंदाजी'सह सोंदर्याची जादू दाखवून देणारी ग्रेस हेडनही पिक्चरमध्ये आलीये. बापाच्या वक्तव्यावर तिनं केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात हेडन नेमकं काय म्हणाला? त्यावर लेकीनं काय ट्विट केलंय  त्यासंदर्भात सविस्तर  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य 

ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिका ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. यावेळी जो रुट या मालिकेत आपला क्लास दाखवणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहे. शतकी धमाका करणाऱ्या जो रुटनं कसोटीत ऑस्ट्रेलियन मैदानात एकही शतक झळकावले नाही. हा दुष्काळ संपवून तो यावेळी ऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवेल, असा विश्वास मॅथ्यू हेडन याने व्यक्त केलाय. इंग्लंडच्या बॅटरवर भरवसा दाखवताना त्याने डोकं फिरल्यासारखं वक्तव्य केलंय. युट्यूब चॅनेलवर जो रुटच्या  त्यामुळे हा मुद्दा अधिक चर्चेचा विषय ठरतोय.   

पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

नेमक काय म्हणाला हेडन? त्यावर लेक ग्रेस हिची काय आली प्रतिक्रिया

Matthew Hayden’s daughter Grace to Joe Root

जो रुट हा सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या भात्यातून शतक येईल, याची खात्री बाळगणं अजिबात चुकीच नाही. इंग्लंड बॅटरवर विश्वास व्यक्त करताना हेडन याने आश्चर्यचकित करून सोडणारे वक्तव्य केले आहे. जर जो रुटनं शतक केले नाही तर विवस्त्र होऊन मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला फेऱ्या मारीन, असे तो म्हणाला आहे. वडिलांच्या या वक्तव्यावर लगेच ग्रेस हेडन हिने एक ट्विट केले. प्लीज जो रुट एक शतक कर...अशी विनंती तिने आपल्या ट्विटमध्ये केल्याचे दिसते. बापाच अजब गजब वक्तव्य अन् त्यावर लेकीनं थेट जो रुटला केलेली विनंती हा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

जो रुट भारीच, पण ऑस्ट्रेलिया दिसली नाही जादू

जो रुटनं आपल्या कसोटी कारकिर्दीत १३४ सामन्यात ३० शतकाच्या मदतीने १३ हजार ५४३ धावा काढल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. पण ऑस्ट्रेलियात त्याच्या भात्यातून अद्याप एकही कसोटी शतक पाहायला मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियन  मैदानात त्याने १४ कसोटी सामन्यात ९ अर्धशतकासह ८९२ धावा केल्या आहेत.

टॅग्स :जो रूटइंग्लंडआॅस्ट्रेलियाअ‍ॅशेस 2019