पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धा वेगवेळ्या वादग्रस्त मुद्यांवरुन चर्चेत आली आहे. आधी या स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय बंद दरवाजाआड खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि डेविड वॉर्नर (David Warner) यांसारख्या नामांकित खेळाडूंना धमक्या मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या. आता स्पर्धेला सुरुवात झाल्यावर पांढरा चेंडू गुलाबी झाल्याचा मुद्दा गाजत असताना उद्घाटन समारंभाला उपस्थितीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांच्यासंदर्भातील वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजी ही पोस्ट पाकिस्तानच्या क्रिकेटरची आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यावर आता क्रिकेटरनं स्पष्टीकरण दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तान क्रिकेटरची वादग्रस्त पोस्ट
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याच्या ट्विटर अकाउंटवरुन पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांच्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यात आली होती. मरियम या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत.
"ओह माय गॉड, रोहित...!" हिटमॅनचे फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन पाहून नीता अंबानीही झाल्या थक्क; 'तो' व्हिडिओ व्हायरल
PSL मधील उद्घाटन सामना अन् मरियम नवाज चर्चेत
पीएसएलच्या ११व्या हंगामातील पहिला सामना लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समन यांच्यात खेळवण्यात आला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या उद्घाटनाच्या सामन्यात मरियम नवाज शरीफ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या उपस्थितीचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवरुन (ट्विटर) पोस्ट केला होता.
वादग्रस्त पोस्टवर पाकिस्तानी क्रिकेटरच स्पष्टीकरण
हा व्हिडिओ रिपोस्ट करताना नसीम शाहच्या अकाउंटवरून, “त्यांना लॉर्ड्सची राणी असल्यासारखी वागणूक का दिली जात आहे?” अशी प्रतिक्रिया दिली आली. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि मोठा वाद निर्माण झाला. मात्र नंतर नसीम शाहने स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांचे एक्स अकाउंट हॅक झाले होते. पुढील पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, अकाउंट यशस्वीपणे रिकव्हर करण्यात आले असून, आधीची टिप्पणी त्यांच्या वैयक्तिक मतांचे प्रतिनिधित्व करत नाही.