Join us

लग्न कठीण...! जग हैराण असेल पण सानियाने दोन दिवसांपूर्वीच स्टेटस ठेवलेला

Sania Mirza- Shoaib Malik Divorce News: सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरु होती. अधून मधून दोघेही त्यावर पांघरून टाकत होते. परंतु घटस्फोट झाल्याची बातमी अशापद्धतीने बाहेर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 13:43 IST

Open in App

ज्या गोष्टीची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती, तीच घडली आहे. भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे. शोएबशी लग्न करून सानियाने भारतीय चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. परंतु, न डगमगता तिने २०१० पासून गेल्या वर्षीपर्यंत संसार केला होता. आज शोएब मलिकने तिसरे लग्न करत सानियासोबतच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले आहे. 

शोएबने इन्स्टावर फोटो पोस्ट करून जगाला धक्का दिला आहे. परंतु शोएबच्या या तिसऱ्या लग्नाची भनक सानियाला दोन दिवसांपूर्वीच लागली होती. तिने लग्न कठीण, घटस्फोटही कठीण, आपण कठीण ते निवडायचे असा स्टेटस ठेवला होता. 

शोएबने पाकिस्तानी अॅक्ट्रेस सना जावेदसोबत लग्न केले आहे. ती देखील घटस्फोटीत आहे. २०२० मध्ये तिने एका पाकिस्तानी गायकासोबत संसार थाटला होता. परंतु त्यांचा संसार २०२३ मध्येच मोडला. मलिक त्याच काळात तिच्या संपर्कात आला होता, अशी चर्चा आहे. कदाचित मलिकमुळेच तिचा संसार मोडला असेही बोलले जात आहे. 

सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरु होती. अधून मधून दोघेही त्यावर पांघरून टाकत होते. परंतु घटस्फोट झाल्याची बातमी अशापद्धतीने बाहेर आली आहे. शोएबने थेट तिसऱ्या लग्नाचे फोटो टाकून सानियासोबतच्या घटस्फोटाची बातमी दिली आहे. 

लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. तंदुरुस्त राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. कर्जात अडकणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. संवाद अवघड आहे. संवाद न करणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. जीवन कधीही सोपे होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल, परंतु आपण आपले कठोर परिश्रम निवडू शकतो, असे सानियाने स्टेटसमध्ये म्हटले होते.  

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकघटस्फोटपाकिस्तान