लंडन - क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण रविवारी आटोपलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत जे काही झाले ते क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. या लढतीच्या शेवटच्या दिवशी दुखापतग्रस्त झालेला ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ याच्या जागी चक्क 12 वा खेळाडू मार्न्स लाबुशेन फलंदाजीसाठी आला. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 12 खेळाडू असूनही सामन्यात फलंदाजी करणारा लाबुशेन हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचे झाले असेकी, लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ हा इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू मानेवर लागून जखमी झाला. त्यावेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुढे फलंदाजी केली. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागला. त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणे त्याच्यासाठी अशक्य झाले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!
12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!
क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 12:07 IST