Join us

विवाहबाह्य संबंध व पत्नीला मारहाण? हसीनच्या फेसबुक पोस्टमुळे क्रिकेटपटू मोहम्मद शामी अडचणीत 

आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप फेसबुक अकाऊंटवरून करत भारतीय क्रिकेट संघातील एका आघाडीच्या क्रिकेटपटूच्या पत्नीने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आणले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 10:01 IST

Open in App

कोलकाता - आपल्या पतीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असून, त्याने आपल्याला मारहाणही केल्याचा सनसनाटी आरोप फेसबुक अकाऊंटवरून करत भारतीय क्रिकेट संघातील एका आघाडीच्या क्रिकेटपटूच्या पत्नीने आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आणले आहेत. भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मोहम्मद शामीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत.  दरम्यान या प्रकारामुळे शामीचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. 

या संदर्भातील वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरील संभाषणाच्या हवाल्याने शामीचे विवाहबाह्य संबंध असल्य़ाचा दावा करण्यात येत आहे. शामीचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध असून, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यावर शामीने आपणास मारहाण केल्याचा आरोपही त्याच्या पत्नीने केला आहे. दरम्यान, शमी हा सध्या धरमशाला येथे देवधर करंडक स्पर्धा खेळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शामीचे काही तरुणींसोबतचे फोटो  पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शामीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत अद्याप सविस्तर खुलासा झालेला नाही. तसेच शामीने यासंदर्भात बोलणे टाळले आहे. तसेच शामीच्या पत्नीचा मोबाइल स्वीच ऑफ येत असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. 

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघमोहम्मद शामी