Join us

Mannat Kashyap Mankading: जणू अश्विनची छोटी बहीणच... अंडर-19 मध्येही घडला मंकडिंगचा किस्सा, पण पुढे घडलं थोडंसं वेगळंच!

मन्नतने फलंदाजाला बाद करताच अपील केलं, त्यानंतर पंचांनीही तिला बाद ठरवलं पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 19:57 IST

Open in App

Mannat Kashyap Mankading: आर अश्विन आणि दीप्ती शर्मा हे दोन भारतीय गोलंदाज. यांच्यात एक साम्य म्हणजे या दोघांनीही मंकडिंग पद्धतीने फलंदाजाला तंबूत पाठवलं. अश्विनने IPL मध्ये बटलरला बाद केले होते. तर अलीकडच्या काळात दिप्ती शर्माने नॉन-स्ट्राइक एंडच्या फलंदाजांला चांगलाच धडा शिकवला आणि सामना जिंकवला. चेंडू टाकण्यापूर्वी धावा काढण्याची घाई फलंदाजाला कशी महागात पडू शकते हे भारतीय गोलंदाजांनी उर्वरित संघांना चांगलेच दाखवून दिले आहे. आता १९ वर्षीय भारतीय गोलंदाज मन्नत कश्यपनेही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला शिकवला, पण असे होऊनही दक्षिण आफ्रिकेची फलंदाज मैदानाबाहेर गेली नाही. नक्की काय घडलं, जाणून घेऊया.

नक्की काय घडलं?

भारताचा अंडर-19 महिला संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तिथे मंगळवारी दोघांमध्ये T20 सामना खेळला गेला. १७ व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वी, मन्नतने नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या जेना इव्हान्सला धावबाद केले. चेंडू फेकण्याच्या वेळी ती क्रीजमधून बाहेर पडली होती. त्यामुळे मन्नतने पटकन स्टंप उडवत तिला बाद केले. अंपायरनेही तिला आऊट दिले. पण त्यानंतर शफाली वर्माने महिला खेळाडूला परत बोलावले. आधी केलेले अपील रद्द करत खिलाडूवृत्तीचा नमुना पेश करण्याच्या उद्देशाने शफालीने तसे केल्याचे बोलला जात आहे.

भारताचा आफ्रिकेवर विजय

प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या. श्वेता सेहरावत आणि सौम्या तिवारी यांनी सर्वाधिक ४०-४० धावा केल्या. भारताने दिलेल्या १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकात ८ गडी बाद ८३ धावाच करू शकला आणि भारताने ५४ धावांनी सामना जिंकला. या सामन्या दरम्यान मन्नतने नॉन स्ट्राइक फलंदाजांना धावबाद केले. असे असूनही फलंदाज खेळतच राहिला.

टॅग्स :सोशल व्हायरलआर अश्विनभारतद. आफ्रिका
Open in App