Join us  

विश्वचषकात सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे, रोहित-कोहलीने सलामीला यावे - मांजरेकर

मांजरेकरने सांगितले की, ‘माझ्यामते सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य आहे. विशेष करून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला खेळणार असल्याचे वृत्त ऐकण्यास मिळत असताना तिसऱ्या क्रमांकावर सूर्यालाच खेळविले पाहिजे. लोकेश राहुलबाबत संघाच्या काय योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 9:24 AM

Open in App

मुंबई : ‘टी-२ ० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली सलामीला खेळल्यास, सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे. तिसºया क्रमांकासाठी तो योग्य पर्याय आहे,’ असे भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने सांगितले. यंदा मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात रोहित-कोहली यांनी डावाची सुरुवात करताना ९४ धावांची सलामी दिली होती. २०१४ साली न्यूझीलंडविरुद्धही दोघांनी सलामी दिली होती.मांजरेकरने सांगितले की, ‘माझ्यामते सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य आहे. विशेष करून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला खेळणार असल्याचे वृत्त ऐकण्यास मिळत असताना तिसऱ्या क्रमांकावर सूर्यालाच खेळविले पाहिजे. लोकेश राहुलबाबत संघाच्या काय योजना आहे. याची कल्पना नाही. सूर्यासारख्या खेळाडूसाठी संघात जागा आहे. मी आयपीएलच्या पूर्ण सत्रात त्याच्याइतकी प्रभावी फलंदाजी करताना कोणाला पाहिल्याचे लक्षात नाही.’

-  श्रीलंका दौऱ्यात ईशान किशनवर जास्त लक्ष असणार, असे मांजरेकरने सांगितले. याबाबतीत मांजरेकर म्हणाला की, ‘ईशान किशन माझा आवडता खेळाडू आहे. कारण सातत्यपूर्ण कामगिरीने फलंदाजी करणारा खेळाडू मला आवडतो. मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाला कसोटी क्रिकेटप्रमाणे महत्त्व नसते आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याचे महत्त्व आणखी कमी होते. -  त्यामुळे तुम्हाला चांगल्या फलंदाजाची निवड करावी लागते. संजू सॅमसन जेव्हा फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याच्याहून सर्वोत्तम दुसरा कोणी नसतो. पण माझ्यासाठी सातत्य सर्वांत महत्त्वाचे असून, सॅमसनऐवजी मी किशनला पसंती देईन.’ 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादव