Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!

Mumbai Indians: आयपीएल २०२६ च्या सहाव्या विजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 00:21 IST

Open in App

आयपीएल २०२६ च्या सहाव्या विजेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि टी-२० कर्णधार मिचेल सँटनर  मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. ४ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी तो प्लईंग इलेव्हनचा भाग असू शकतो.

आयपीएल यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला मुंबईचे काही विदेशी खेळाडू गैरहजर होते. मिचेल सँटनर आणि इंग्लंडचा विल जॅक्स यांनी वैयक्तिक कारणास्तव रजेची मागणी केली होती, ज्यामुळे ते पहिल्या सामन्यात खेळू शकले नाहीत. सँटनर आता संघात परतला असला, तरी विल जॅक्सच्या पुनरागमनाबाबत अद्याप साशंकता कायम आहे.

मुंबई इंडियन्सने आपल्या मोहिमेची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवून केली आहे. वानखेडे स्टेडियमवर २२० धावांचे विशाल लक्ष्य असतानाही रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांच्यातील १४८ धावांच्या झंझावाती सलामी भागीदारीमुळे मुंबईने सहज विजय मिळवला. आता सँटनरच्या समावेशामुळे संघाची फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजीची खोली अधिक मजबूत झाली आहे.

मुंबई इंडियन्सने सँटनरला २०२५ च्या लिलावात २ कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि २०२६ च्या हंगामासाठी त्याला १ कोटी रुपयांत कायम ठेवले आहे. २०२५ मध्ये त्याने १३ सामन्यांत ७.९२ च्या इकॉनॉमी रेटने १० विकेट्स घेतल्या. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये त्याने कर्णधार म्हणून न्यूझीलंडला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली. त्याने स्पर्धेत १४२.८५ च्या स्ट्राईक रेटने १२० धावा कुटल्या.

मुंबई इंडियन्सने २०२० मध्ये आपले शेवटचे जेतेपद पटकावले. गेल्या काही वर्षांपासून अंतिम फेरी गाठण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुंबईला सँटनरच्या अष्टपैलू कामगिरीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. उद्या दिल्लीच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर सँटनर मुंबईसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Indians bolstered: Star all-rounder joins, likely to play Delhi!

Web Summary : Mumbai Indians' title hopes get a boost with Mitchell Santner's arrival. The Kiwi all-rounder is expected to feature in the Delhi Capitals match, strengthening the team's spin and batting depth. His past performance and T20 captaincy experience add valuable experience to the squad.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सऑफ द फिल्ड