लंडन - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. पण भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र विश्वचषक स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरत आहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला असून, या विश्वचषक स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती होणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा शेवटचा सामना हा धोनीचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरू शकतो.
पण धोनीवर सातत्याने टीका होत असताना, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर माहीच्या मदतीला धावला आहे. , बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर तेंडुलकर म्हणाला,''मला वाटतं ती महत्त्वाची खेळी होती आणि संघाला जशा खेळीची गरज होती, धोनी तसाच खेळला. तो 50 षटकं खेळपट्टीवर टिकून राहिला, तर इतर फलंदाजांवरील दडपण कमी होतं. त्याच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि तो तेच करतोय. त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.''
रोहित, बुमराहचं कौतुक, तर क्रिकेटप्रेमींसाठी धोनी पुन्हा ठरला व्हिलन धोनीच्या कासवछाप खेळीनंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली. अनेक क्रिकेटप्रेमींनी धोनीच्या अतिबचावात्मक खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र अखेरीस गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा चिवट प्रतिकार मोडून भारतीय संघाला विजय मिळवता आला.