Join us
Daily Top 2Weekly Top 5

CSK चा ८.४० कोटींचा ‘हिरा’ आता DC चा 'हिरो'! जाणून घ्या Sameer Rizvi च्या IPL मधील प्रवासाची गोष्ट

आयपीएलमधील सलग दुसरे मॅचविनिंग अर्धशतक! तेही नाबाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 00:45 IST

Open in App

LSG vs DC IPL 2026 Sameer Rizvi Shines As Delhi Capitals Beat Lucknow Super Giants  : आयपीएल २०२६ च्या हंगामातील सलामीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय खेळाडू समीर रिझवी याने आयपीएलमधील सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. गत हंगामातील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळीसह संघाला विजय मिळवू देत स्पर्धेचा शेवट गोड केला होता. आता यंदाच्या हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्सला सलामीच्या सामन्यात विजय मिळवून देणारी नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चौथ्या क्रमांकावर इम्पॅक्टफुल खेळी!

लखनौच्या एकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंतच्या नेतृत्वाखालील लखनौच्या संघाने दिल्ली कॅपिटल्ससमोर १४२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामी जोडी २१ धावांवरच तंबूत परतली. संघ अडचणीत असताना इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूनं आपल्या भात्यातील फटकेबाजीचा सुरेख नजराणा पेश करत लखनौच्या बाजूनं फिरलेला सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं वळवला. 

LSG सेनापती कमनशिबी ठरला! मग DC च्या गोलंदाजांसमोर सगळ्यांनीच तलवार केली म्यान

CSK नं 'करोडपती' केले, पण...

समीर रिझवी याने उत्तर प्रदेश टी२० लीगसह देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवून देत आयपीएलमध्ये एन्ट्री मारली. उजव्या हाताने आक्रमक अंदाजात फलंदाजी करणारा हा युवा खेळाडू ऑफ स्पिनरच्या रुपातही उपयुक्त कामगिरी बजावू शकतो.  २०२४ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने या अनकॅप्ड खेळाडूसाठी ८ कोटी ४० लाख एवढी मोठी रक्कम मोजली होती. गुजरात टायटन्सकडून पदार्पणात त्याने राशीद खानच्या गोलंदाजीवर षटकारासह खाते उघडले होते. पण चेन्नई सुपर किंग्सने अल्प संधी देत त्याला रिलीज केले. 

किंमत कमी झाली, पण हिंमत दाखवली

२०२५ च्या हंगामापासून हा खेळाडू ९५ लाखांमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळताना दिसतोय. यंदाच्या हंगामात DC नं त्याच्या चौथ्या क्रमांकावरील महत्त्वपूर्ण भूमिका सोपवली आहे. पहिल्याच सामन्यात त्याने ही भूमिका बजावण्यासाठी सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात समीर रिझवी याने ४७ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७० धावांची नाबाद खेळी साकारली.

IPL मधील कामगिरी  

समीर रिझवीनं २०२४ मध्ये आयपीएल पदार्पणात चेन्नई सुपर किंग्सकडून ८ सामने खेळले. यात त्याने फक्त ५१ धावा केल्या होत्या. गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून त्याला पाच सामन्यात संधी मिळाली. पंजाब किंग्ज विरुद्धच्या नाबाद ५८ धावांच्या खेळीसह त्याने या हंगामात १२१ धावा केल्या होत्या.  यंदाच्या हंगामात IPL मधील सलग दुसरे आणि तेही नाबाद अर्धशतक झळकावत या पठ्ठ्यानं यंदाचा हंगाम गाजवण्याचे संकेत दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : CSK's find Sameer Rizvi shines for DC in IPL.

Web Summary : Sameer Rizvi, once with CSK, now excels for Delhi Capitals, scoring consecutive IPL half-centuries. Bought for 8.40 crore by CSK but later released, he proves his worth with a match-winning unbeaten 70 against Lucknow, showcasing his aggressive batting.
टॅग्स :आयपीएल २०२६दिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्सरिषभ पंतअक्षर पटेल