भारताविरुद्ध मालिका गमावणे आयुष्यातील सर्वात वाईट क्षण

जस्टिन लेंगर । पराभवानंतर हसणेदेखील विसरलो होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 02:58 AM2020-04-12T02:58:50+5:302020-04-12T02:58:58+5:30

whatsapp join usJoin us
Losing a series against India is one of the worst moments of life | भारताविरुद्ध मालिका गमावणे आयुष्यातील सर्वात वाईट क्षण

भारताविरुद्ध मालिका गमावणे आयुष्यातील सर्वात वाईट क्षण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी : ‘भारताविरुद्ध स्थानिक मालिकेत झालेल्या अभूतपूर्व पराभव हा कारकिर्दीत सर्वांत वाईट क्षण ठरला. त्या पराभवामुळे कोचिंग करिअरवर‘टांगती तलवार होती,’असे मत आॅस्ट्रेलिया संघाचे कोच जस्टिन लेंगर यांनी व्यक्त केले आहे. दोन वर्षांपूर्वी भारताकडून मायदेशात कसोटी मालिकेत पराभव होताच मी खडबडून जागा झालो. माझ्या कारकि र्दीत हा निर्णायक क्षण होता.

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०१८ साली आमच्याच मैदानावर आम्हाला चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केल्यामुळे मी हादरलो होतो, असे लेंगर यांनी सांगितले. या मालिकेनंतर खेळाडूंंनी लेंगर यांच्या नकारात्मकवृत्तीची बोर्डाकडे तक्रार केली होती. लेंगर यांच्या पत्नीने त्यांना, ‘हसणे विसरलात का,’ असा सवाल केला होता. खुद्द लेंगर म्हणाले, ‘या पराभवामुळे माझी झोप उडाली. त्याआधी दहा वर्षांत कधीही माझ्यावर कुणी शंका घेतली नव्हती. मागे वळून पाहतो तेव्हा माझ्या कारकिर्दीला वळण देणारा तो क्षण होता,’ याची मनोमन खात्री पटते. लेंगर यांनी या क्षणाची तुलना आधी घडलेल्या एका प्रसंगाशी केली. त्यावेळी लेंगर यांना संघाबाहेर करण्यात आले होते. नंतर त्यांनी मॅथ्यू हेडनसोबत सर्वात यशस्वी सलामी जोडी म्हणून ख्याती मिळवली. कठीण प्रसंगी तुम्ही काय शिकता, हे शानदार ठरते. दहा वर्षानंतर मी कोचिंग करिअरची समीक्षा करेन त्यावेळी भारताविरुद्ध मालिकेत आलेले अनुभव आठवतील. असेच कठीण प्रसंग आयुष्यात तुम्हाला भक्कम बनवतात, असे लेंगर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

२००१ ला वयाच्या ३१ व्या वर्षी माझी संघातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी करिअर संपुष्टात आल्यासारखे वाटत होते. तथापि ती माझ्यादृष्टीने यशस्वी क्रिकेटपटू म्हणून उदयास येण्याची नांदी ठरली.
- जस्टिन लेंगर, कोच आॅस्ट्रेलिया

Web Title: Losing a series against India is one of the worst moments of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.