Join us

विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) या कारवाईनं सर्वांच्या भूवया उंचावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 12:02 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे जगभरात फॅन्स आहेत.. जाहीरात क्षेत्रातही विराट कोहली, हे मोठं नाव आहे. त्यामुळे मोठमोठ्या ब्रँड्सना विराटनं आपली जाहीरात करावी असेच वाटते आणि त्यासाठी कितीही रक्कम मोजण्याची तयारी असते. पण, विराट कोहलीचा फोटो असलेल्या एका जाहिरातीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी पथकानं कारवाई केली आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण? 

उत्तर प्रदेश येथील एका स्थानिक क्रिकेट लीगनं जाहीरात करण्यासाठी विराट कोहलीच्या फोटोचा वापर केला. एनसीआर क्रिकेट असोसिएशनकडून 'एनसीआर क्रिकेट लीग'चे आयोजन केले गेले आहे आणि बीसीसीआयनं ही लीग अनधिकृत जाहीर केली आहे. 11 ऑगस्टपासून ही लीग सुरू झाली आणि यू ट्यूबवर त्याचं थेट प्रक्षेपण केलं गेलं. ''याबाबत आम्ही त्यांना सूचना केल्या आहेत. या लीगमध्ये नोंदणीकृत खेळाडूंनी सहभाग घेऊ नये, अशा सूचना आम्ही केल्या आहेत,''असेही बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशननं परवानगी दिल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. पण, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशननं हा दावा फेटाळला आहे आणि त्यांनीही नोंदणीकृत खेळाडूंना लीगपासून दूर राहण्यास सांगितले आहे. मोबाईल प्रीमिअर लीग या अॅपवर सहभागी खेळाडूंना टीम तयार करण्यास आयोजकांनी सांगितले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली MPLचा सदिच्छादूत आहे. पण, MPLने या लीगशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान! 

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?  

टॅग्स :बीसीसीआयविराट कोहली