लाइव्ह मॅचमध्ये कॅप्टनने बॉलरला केले किस, ब्रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

सिडल आणि वॉरेलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 19:27 IST2021-12-22T16:42:00+5:302021-12-22T19:27:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
In a live match, the captain kisses the bowler, the video of Bromans going viral | लाइव्ह मॅचमध्ये कॅप्टनने बॉलरला केले किस, ब्रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

लाइव्ह मॅचमध्ये कॅप्टनने बॉलरला केले किस, ब्रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली: सध्या ऑस्ट्रेलियात बीग बॅश लीग (BBL)सुरू आहे. अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्यादरम्यान प्रेक्षकांना वेगळेच दृष्य पाहायला मिळाले. सिडनीचा वेगवान गोलंदाज पीटर सिडल लाइव्ह सामन्यादरम्यान त्याचा सहकारी गोलंदाज डॅनियल वॉरेलच्या गालावर किस करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कर्णधार सिडलने सामन्यातील पहिले षटक डॅनियल वॉरेलला दिले. यादरम्यान तो वर्तुळातच क्षेत्ररक्षण करत होता. पहिल्या चेंडूनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हा ब्रोमान्स पाहायला मिळाला. आधी दोघांमध्ये खूप मजेदार संभाषण झाले, त्यानंतर सिडलने डॅनियलला किस केले. सिडल आणि वॉरेलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'कर्णधार आपल्या गोलंदाजाला विकेट घेण्यासाठी प्रवृत्त करत आहे'. दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'हे वेगळ्या प्रकारचे प्रेम आहे.'

दोन्ही गोलंदाजांना धुतले

या सामन्यात पीटर सिडल आणि डॅनियल वॉरेलला एकही विकेट घेता आली नाही. पीटर सिडलने सामन्यात 3.2 षटके टाकली आणि 40 धावा दिल्या. तर, डॅनियल वॉरेलने 27 धावा दिल्या. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत स्ट्रायकर्सनी 20 षटकात 8 गडी गमावून 147 धावा केल्या. सिडनी सिक्सर्सकडून सीन अॅबॉट आणि डॅनियल ख्रिश्चन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

सिडनी सिक्सर्सने सामना गमावला

लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनीच्या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. जोश फिलिप आणि जेम्स विन्स यांनी शानदार फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. फिलिप 23 आणि विन्स 21 धावा करून बाद झाले. शेवटच्या षटकात रेशमने केवळ 24 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. सिडनीने 4 चेंडू बाकी असताना शानदार विजयाची नोंद केली. स्ट्रायकर्सकडून राशिद खानने 3, तर जॉर्ज गार्टेनने 2 विकेट्स घेतल्या. पीटर सिडल आणि डॅनियल वॉरेल यांच्या खराब गोलंदाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: In a live match, the captain kisses the bowler, the video of Bromans going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.