Join us

2027 सोडा, 2031 च्या विश्वचषकातही खेळेल विराट! दिग्गज क्रिकेटरचं उत्तर ऐकूण खूश व्हाल!

भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर विराट कोहली हा कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची धडकन बनला आहे. विराटने 2023 च्या विश्वचषकात जबरदस्त ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:59 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर विराट कोहली हा कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची धडकन बनला आहे. विराटने 2023 च्या विश्वचषकात जबरदस्त फलंदाजी केली. यानंतर, आता 2027 च्या विश्वचषकातही तो भारतीय संघात दिसावा अशीच त्याच्या अनेक चाहत्यांची इच्छा असेल. मात्र यातच, कोहलीच्या 2031 चा विश्वचषक खेळण्यासंदर्भात एका दिग्गज क्रिकेटरने भाष्य केले आहे. जे ऐकून प्रत्येक चाहत्याचा आनंद द्विगुणित होईल. हा दिग्गज दुसरा तिसरा कुणी नसून ऑसीसंघाचा डेव्हिड वॉर्नर आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर आणि 2023 विश्वचषक संघाचा भाग असलेला डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असतो. तो अनेक वेळा चाहत्यांच्या प्रश्नांनाही उत्तर देताना दिसतो. पुन्हा एकदा असेच झाले आहे. सोशल मीडिया प्लेटफार्म एक्सवर एका फॅनने वॉर्नरला टॅग करून, आपण 2027 चा विश्वचषक खेळाल? मला आपल्याला त्या विश्वचषकात खेळताना बघायला आवडेल. यावर उत्तर देताना वॉर्नरने, '2031' असे लिहीत स्माइलचा इमोजी पोस्ट केला आहे. हे त्याने कॉमेडी स्वरुपात म्हणल्याचे दिसत स्पष्टपणे दिसत आहे. 

कोहलीसंदर्भात दिलं जबरदस्त उत्तर - यानंतर आणखी एका युजरने लिहिले की, 'विराटही 2031 वर्ल्ड कपपर्यंत खेळेल, अशी आशा आहे.' यावरही गमतीशीर उत्तर देत वॉर्णर म्हणाला, 'काहीच हरकत नाही, तो का खेळू शकत नाही? तोपूर्णपणे फीट आहे आणि या खेळावर त्याचे अत्यंतिक प्रेमही आहे.' त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरलही होत आहे. महत्वाचे म्हणजे, कोहली आणि वॉर्नर यांचे आगामी विश्वचषकात खेळणे निश्चित नाही. हे भविष्यात स्पष्ट होऊ शकेल.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघवन डे वर्ल्ड कप