Join us

सचिन तेंडुलकरने मुलांना दिले 'असेही' धडे...

सचिन सध्या भुतानमध्ये युनिसेफ या संस्थेच्या अभियानासाठी गेला आहे. यावेळी सचिनने येथील मुलांबरोबर फुटबॉल खेळ आपला वेळ व्यतित केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 17:59 IST

Open in App
ठळक मुद्देसचिनने भुतानमध्ये जाऊन तिकडच्या मुलांना खास धडे दिले आहेत.

नवी दिल्ली : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या अकादमीची स्थापना केली आहे. त्याचबरोबर सचिनने बऱ्याच जणांना क्रिकेटचे धडेही दिले आहे. पण सचिनने भुतानमध्ये जाऊन तिकडच्या मुलांना खास धडे दिले आहेत.

सचिन सध्या भुतानमध्ये युनिसेफ या संस्थेच्या अभियानासाठी गेला आहे. यावेळी सचिनने येथील मुलांबरोबर फुटबॉल खेळ आपला वेळ व्यतित केला. त्याचबरोबर त्यानंतर या मुलांना काही टिप्सही दिल्या.

खेळून झाल्यावर सचिन या मुलांना घेऊन गेला ते थेट हात धुण्यासाठी. हात स्वच्छ नसतील तर बरेच आजार होऊ शकतात. यासाठी युनिसेफने #IWashMyHands हे अभियान सुरु केले आहे. त्यासाठी सचिन सध्या भुतानमध्ये असून त्याने मुलांना हात धुण्याचे धडे दिले आहेत.

टॅग्स :सचिन तेंडुलकरभूतान