Video: अजब गजब गोंधळ! युसूफ पठाणला आधी अंपायरनेच दिलं OUT, मग स्वत:च मैदानात बोलावलं 

लिजंड्स लीग २०२३ मध्ये झाला वेगळाच राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:46 IST2023-11-30T11:43:46+5:302023-11-30T11:46:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
legends league cricket yusuf pathan called back after giving out by umpire in dropped catch video bhilwara kings vs soutern superstars | Video: अजब गजब गोंधळ! युसूफ पठाणला आधी अंपायरनेच दिलं OUT, मग स्वत:च मैदानात बोलावलं 

Video: अजब गजब गोंधळ! युसूफ पठाणला आधी अंपायरनेच दिलं OUT, मग स्वत:च मैदानात बोलावलं 

Yusuf Pathan LLC 2023: लिजेंड्स लीग क्रिकेटचा १०वा सामना जम्मूमध्ये बुधवारी भिलवाडा किंग्ज आणि सदन सुपरस्टार्स यांच्यात खेळला गेला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. नाणेफेक हरल्यानंतर भिलवाडा किंग्ज प्रथम फलंदाजी करत होता. अशा स्थितीत १७ षटकांच्या सामन्यात त्यांना ६ विकेट्सवर केवळ ११७ धावा करता आल्या. मात्र सदन सुपरस्टार्सला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि पावसामुळे सामना रद्द झाला. या सामन्यात विशेष काही पाहायला मिळाले नाही. पण युसूफ पठाणसोबत असे काही घडले की, आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण त्याचा भाऊ इरफान पठाणच्या नेतृत्वाखाली भिलवाडा किंग्ज संघाकडून खेळत आहे. अशा स्थितीत जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जोहान बोथा याच्याकरवी झेलबाद झाला. अशा स्थितीत युसूफ पठाण परत जायला लागला. पण अंपायरने आधी झेल तपासण्याचा निर्णय घेतला. अंपायरने तपासले असता सर्व काही स्पष्ट झाले आणि रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे स्पष्ट दिसले. अशा परिस्थितीत अंपायरने युसूफ पठाणला नाबाद घोषित केले आणि त्याला पुन्हा फलंदाजी करण्यासाठी बोलावले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ लिजेंड्स लीग क्रिकेटने स्वतःच्या ट्विटर हँडलवर शेअर केला.

या सामन्यात युसूफ पठाणला आपल्या संघासाठी विशेष धावा करता आल्या नाहीत. त्याला ८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने केवळ १४ धावाच करता आल्या. भिलवाडा किंग्जसाठीही यंदाचा हंगाम फारसा चांगला राहिलेला नाही. त्यांना ४ पैकी केवळ १ सामना जिंकता आला आहे.

Web Title: legends league cricket yusuf pathan called back after giving out by umpire in dropped catch video bhilwara kings vs soutern superstars