Join us

ऐकावं ते नवलंच; शिवरामकृष्णन यांचा निवड समिती प्रमुख पदासाठीचा अर्जच 'गायब'

भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुख पदासाठी केलेला अर्जाचा मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) इनबॉक्समधून गायब झाल्याची बाबत समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 15:42 IST

Open in App

भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी टीम इंडियाच्या निवड समिती प्रमुख पदासाठी केलेला अर्जाचा मेल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) इनबॉक्समधून गायब झाल्याची बाबत समोर आली आहे. भारताचे माजी फिरकीपटू शिवरामकृष्णन यांनी ई मेलद्वारे त्यांचा CV  बीसीसीआयला पाठवला होता. निवड समिती प्रमुखपदासाठी अर्जाची मुदत संपायच्या 48 तास आधी शिवरामकृष्णन यांनी हा मेल वाठवला होता, परंतु तो आता बीसीसीआयच्या इनबॉक्समधून गायब झाला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती प्रमुखाच्या पदासाठी शिवरामकृष्णन यांनी त्यांची संपूर्ण माहिती असलेला CV पाठवला होता, परंतु त्यांचा हा अर्ज बीसीसीआयला मिळालाच नाही. काहींच्या मते त्यांना शिवरामकृष्णन यांचा मेल मिळालाच नाही, तर काहींनी तो डिलीट करण्यात आला असावा, अशी शंका उपस्थित केली आहे. शिवरामकृष्णन यांनी दोन दिवसांपूर्वी मेल केल्याचे सांगितले.

'' बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकवर शिवरामकृष्णन यांचा अर्ज आल्याचे दिसत होते. त्यामुळे या पदाच्या शर्यतीतून त्यांना बाद करण्याचा प्रश्नच येत नाही. शिवा यांनी 22 जानेवारीला सायंकाळी 4.16 मिनिटांनी मेल पाठवला आणि 24 जानेवारी ही अंतिम तारीख होती. CV साठी नवीन ई मेल अॅड्रेस तयार करण्यात आला होता. त्यात 21 अर्ज आले आहेत. म्हणजे 21 ई मेल असायलाच हवेत,'' असे सूत्रांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,''एकच मेल कसा गायब होऊ शकतो? जेव्हा त्या व्यक्तीनं अधिकृत लिंकवरून तो पाठवला होता. तो मेल स्पॅममध्येही कसा दिसत नाही?'' या संदर्भात बीसीसीआय त्यांच्या तांत्रिक विभागाशी चर्चा करत आहे. एमएसके प्रसाद यांच्या जागी शिवरामकृष्णन यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

 मयांक अग्रवालला सूर गवसला, रिषभनेही कसोटीत पुनरागमनासाठी दावा सांगितला

आज होता भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना; जाणून घ्या काय निकाल लागला

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ