Join us

Video : श्रीलंकेच्या खेळाडूने मागचा पुढचा विचार न करता अफलातून झेल टिपला, पण पडले ३-४ दात; सहकारी फिदीफिदी हसले

क्रिकेटमध्ये आजवर अनेक विचित्र प्रकार घडले असतील, परंतु यासारखा कदाचित हा पहिलाच असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:18 IST

Open in App

Lanka Premier League : आशिया चषक विजेत्या श्रीलंका संघाचे खेळाडू सध्या घरच्या मैदानावर सुरू असलेल्या लंका प्रीमिअर लीगमध्ये दम दाखवत आहेत. गॅले ग्लॅडिएटर्स विरुद्ध कँडी फॅलकॉन असा काल सामना झाला आणि त्यात एक विचित्र प्रकार घडला. क्रिकेटमध्ये आजवर अनेक विचित्र प्रकार घडले असतील, परंतु यासारखा कदाचित हा पहिलाच असेल. चमिका करुणारत्ने ( Chamika Karunaratne ) याने मागचा पुढचा विचार न करता अफलातून झेल टिपला, परंतु त्यात त्याचे ३-४ दात पडले आणि सहकारी फिदीफिदी हसू लागले.

प्रथम फलंदाजी करताना ग्लॅडिएटर्स संघाला २० षटकांत ८ बाद १२१ धाव करता आल्या. फॅलकॉनच्या कार्लोस ब्रेथवेटने ४-१-१४-४ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. जहूर खानने दोन विकेट्स घेतल्या. फॅलकॉनकडून खेळणाऱ्या चमिकाने संघासाठी एक एफलातून झेल घेतला. ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर ग्लॅडिएटर्सच्या नुवानिदू फर्नांडोने सुरेख फटका टोलावला. पण, चमिकाने तितकाच परतीचा सुरेख झेल टिपला. खरं तर त्याच्या हातात चेंडू येण्याआधी तो त्याच्या तोंडावर आदळला... तरीही त्याने चेंडू खाली पडू दिला नाही. चमिकाने झेल घेतला खरा, परंतु त्याचे ३-४ दात पडले आणि तोंडातून रक्त वाहू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 

ग्लॅडिएटर्सकडून मोवीन सुबासिंघाने सर्वाधिक ४० धावा केल्या. प्रत्युत्तरात फॅलकॉनने १५ षटकांत ५ बाद १२३ धावा करून विजय मिळवला. कमिंदू मेंडिसने सर्वाधिक ४४ धावा केल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :श्रीलंकाटी-20 क्रिकेट
Open in App