Join us

Virat Kohli audio Leaked ; 'लाला सिराज को स्टार्ट से ही लगा देंगे', कोहलीचा शास्त्रींसोबतच्या चर्चेचा Audio लिक; शास्त्री म्हणाले...

IND vs NZ: रवी शास्त्री व विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठीच्या रणनितीवर चर्चा करत होते आणि दोघंही लाइव्ह आहेत याची कल्पना त्यांना नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:14 IST

Open in App

IND vs NZ: भारतीय कसोटी क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्धच्या जागतिक अजिंक्यपद कसोटीसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या रणसंग्रमासाठी टीम इंडियाचे खेळाडू २ जून रोजी रवाना झाले. पण त्याआधी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरं दिली. Leaked Audio From Virat Kohli’s Press Conference Goes Viral

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या पत्रकार परिषद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. याच पद्धतीनं कालची पत्रकार परिषद झाली. पण या पत्रकार परिषदेतील एका प्रसंगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रवी शास्त्री Ravi Shastriविराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठीच्या रणनितीवर चर्चा करत होते आणि दोघंही लाइव्ह आहेत याची कल्पना त्यांना नव्हती. यात विराट कोहली रवी शास्त्री यांच्यातील चर्चेची ऑडिओ क्लीप सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे. 

भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या संयोजनावर दोघं चर्चा करत असल्याचं या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकू येत आहे. "हम इनको राऊंड द विकेट डलवायेंगे, लेफ्ट हँडर्स हैं इनमें, लाला सिराज सबको स्टार्टसेही लगा देंगे", असं कोहली शास्त्री यांना सांगतोय. त्यावर रवी शास्त्री "हममम" असा होकारार्थी प्रतिसाद कोहलीला देत असल्याचं ऑडिओ क्लीपमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. 

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यातील या चर्चेनुसार आढावा घ्यायचा झाल्यास भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी (लाला) हे दोघंही भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात दिसतील. न्यूझीलंडच्या फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यासाठी सिराज आणि शमी यांच्या वेगवान गोलंदाजी अस्त्राचा टिच्चून मारा करणार असल्याचा टीम इंडियाचा मनसुबा असल्याचं दिसून येतं. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान ही कसोटी रंगणार आहे. यासाठी भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर क्वारंटाइन नियमांचं पालन करावं लागणार असल्यानं सरावासाठी खूप कमी वेळ मिळणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ याआधीच इंग्लंडमध्ये असल्यानं त्यांच्या संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे.  

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंडआयसीसीरवी शास्त्री