"आज कुछ तूफानी करते हैं!; Kusal Perera ची कडक सेंच्युरी! चौकार-षटकारांसह १७ चेंडूत ७६ धावा

Kusal Perera T20I Record : न्यूझीलंड दौऱ्यावरील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या संघानं बाजी मारली. मालिकेत २-० पिछाडीवर ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:08 IST2025-01-02T11:03:52+5:302025-01-02T11:08:16+5:30

whatsapp join usJoin us
Kusal Perera Became First Sri Lanka Batter To Cross 2000 T20I Runs And Scored 101 Runs 46 Balls Against New Zealand | "आज कुछ तूफानी करते हैं!; Kusal Perera ची कडक सेंच्युरी! चौकार-षटकारांसह १७ चेंडूत ७६ धावा

"आज कुछ तूफानी करते हैं!; Kusal Perera ची कडक सेंच्युरी! चौकार-षटकारांसह १७ चेंडूत ७६ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kusal Perera T20I Record : न्यूझीलंड दौऱ्यावरील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या संघानं बाजी मारली. मालिकेत २-० पिछाडीवर असताना व्हाइट वॉशची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेसाठी हा सामना महत्त्वपूर्ण होता. या सामन्यात कुशल परेराचा जलवा पाहायला मिळाला. कडक सेंच्युरी ठोकताना त्याने षटकार चौकारांची 'बरसात' करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या शतकी खेळीत त्याने षटकार-चौकाराच्या माध्यमातून १७ चेंडूत ७६ धावा कुटल्या. 

क्लास सेंच्युरीसह नावे केले खास विक्रम

न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली.  पावरप्लेमध्ये संघानं ४२ धावांत दोन विकेट्स गमावल्या होत्या त्यावेळी कुशल परेरा मैदानात उतरला. संघ अडचणीत असताना दमदार खेळी करत त्याने शतकी खेळीसह काही  खास विक्रम आपल्या नावे केले. 

कुशल परेरानं संपवला १३ वर्षांचा शतकी दुष्काळ

श्रीलंकेच्या डावखुऱ्या फलंदाजानं या सामन्यात ४६ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ४ षटकार मारले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा श्रीलंकेचा तो तिसरा फलंदाज ठरला. याआधी १३ वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संघाकड़ून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सेंच्युरी आली होती. श्रीलंकेकडून महेला जयवर्धने याने २०१० मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले होते.  त्यानंतर २०११ मध्ये दिलशानच्या भात्यातून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १०४ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. 
 
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये  २००० धावांचा टप्पा गाठणारा पहिला श्रीलंकन बॅटर

कुशल परेरानं न्यूझीलंडविरुद्धच्या खेळीसह आंतरारष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा पल्लाही पार केला आहे. अशी कामगिरी करणारा श्रीलंकेचा तो पहिला फलंदाज ठरलाय. आतापर्यंत ७७ टी २० सामन्यातील ७६ डावात त्याच्या भात्यातून २०५६ धावा आल्या आहेत. यात एका शतकासह १५ अर्धशतकांचा समावेश आहे.  

मॅचमध्ये काय घडलं?
 

परेराशिवाय कॅप्टन असलंकाच्या २४ चेंडूतील ४६ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या संगानं निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून सलामीवीर रचिन रविंद्र याने ३९ चेंडूत ६९ धावांची दमदार खेळी केली. पण त्याच्याशिवाय अन्य कुणाला अपेक्षित फटकेबाजी करणं जमलं नाही. परिणामी तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात संघाला निर्धारित २० षटकात ७ बाद २११ धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेनं ७ धावांनी सामना आपल्या नावे केला. 

Web Title: Kusal Perera Became First Sri Lanka Batter To Cross 2000 T20I Runs And Scored 101 Runs 46 Balls Against New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.