इंडियन प्रीमिअर लीगच्या १८ व्या हंगामातील उर्वरित १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक निश्चित झाले आहे. शनिवारी १७ मे पासून पुन्हा ही स्पर्धा सुरु होत आहे. यंदाच्या हंगामात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ दमदार कामगिरी करत असून प्लेऑफ्सचं तिकीट पक्के करण्यासाठी ते फक्त एक पाऊल दूर आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोस बटलर सोडणार गुजरात संघाची साथ
भारत-पाक दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यावर गुजरात टायटन्सने सर्वात आधी नेट प्रॅक्टिसला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा मैदान मारण्यासाठी जोमाने तयारी सुरु असणाऱ्या या संघाला आता एक मोठा क्का बसला आहे. सुधारित नव्या वेळापत्रकाचा गुजरात टायटन्सला मोठा दणका बसला असून संघातील स्टार आणि भरवशाचा खेळाडू असलेला विकेट किपर बॅटर जोस बटलर प्लेऑफ्सच्या लढतीआधीच मायेदशी परतणार आहे.
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
प्लेऑफ्सच्या लढतीसाठी बटलरच्या जागी नव्या भिडूची एन्ट्री
इंग्लंडचा संघ घरच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. जोस बटलर या मालिकेत इंग्लंड संघाचा भाग असल्यामुळे आयपीएलच्या प्लेऑफ्समध्ये तो खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी गुजरात टायटन्सच्या संघाने बदली खेळाडूच्या रुपात प्लेऑफ्सच्या लढतीसाठी श्रीलंकेच्या कुसल मेंडिस याला संघात सामील करून घेतले आहे.
PSL ला ठेंगा दाखवत कुसल मेंडिस IPL खेळणार
श्रीलंकेचा विकेट किपर बॅटर कुसल मेंडिस हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्स संघाचा भाग होता. भारत-पाक यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलसोबतच पाकिस्तानमधील टी-२० लीग स्पर्धाही स्थगित करण्यात आली होती.ईएसपीएन क्रिकइंन्फोच्या वृत्तानुसार, श्रीलंकच्या विकेट किपर बॅटरनं सुरक्षिततेच्या कारणास्तवर पुन्हा पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. आता तो बटलरच्या जागी आयपीएलमध्ये एन्ट्री मारण्यास सज्ज आहे.
गुजरातसाठी संघ प्लेऑफ्सचा पेपर एकदम सोपा
यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सच्या संघाने ११ पैकी ८ सामन्यातील विजयासह १६ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित ३ सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला तरी ते प्लेऑफ्समधील आपले स्थान निश्चित करतील. १८ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ते मैदानात उतरणार असून या सामन्यात ते प्लेऑफ्सचं तिकीट बूक करू शकतात. संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासात शुबमन गिल आणि साई सुदर्शनशिवाय जोस बटलरनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय प्लेऑफ्सच्या लढती खेळणं गुजरात टायटन्सच्या संघासाठी मोठा धक्काच असेल.