Kumar Sangakkara As RR Head Coach : श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज कुमार संगकारा याच्याकडे राजस्थान रॉयल्सनं आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्याची मुख्य प्रशिक्षक ( RR Head Coach) म्हणून निवड केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी फ्रेंचायझी संघाने संगकाराला डायरेक्टर ऑफ क्रिकेट या पदावर नेमण्यात आलं होते. आता त्याने राहुल द्रविडची जागा घेतली आहे. दुसऱ्यांदा प्रशिक्षक पदाची जबाबदाही सांभाळताना तो संघाला IPL विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नीशील असेल.
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR संघाची खराब कामगिरी
४८ वर्षीय संगकारानं याआधी २०२१ ते २०२४ या कालावधीत राजस्थान फ्रँचायझी संघाचे मुख्य प्रशिक्षक पद सांभाळले होते. २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघानं राहुल द्रविडकडे ही जबाबदारी दिली. टीम इडियाला वर्ल्ड टी-२० चॅम्पियन करणाऱ्या द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी खराब राहिली. राजस्थानच्या संघाने २०२५ च्या हंगामात १४ पैकी फक्त ४ सामने जिंकले. हंगाम संपल्यावर द्रविडनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भर...
२०२२ मध्ये संगकाराच्या मार्गदर्शनाखाली RR नं मारली होती फायनलमध्ये धडक, पण...
राजस्थान रॉयल्सच्या संघाने पुन्हा एकदा भरवसा दाखवल्यावर संगकारा म्हणाला की, "मुख्य प्रशिक्षकाच्या रुपात परत येणं ही सन्मानजक गोष्ट आहे. प्रतिभावान खेळाडूंसह आमच्याकडे एक मजबूत कोचिंग टीम आहे, विक्रम (Vikram Rathour), ट्रेवर (Trevor Penney), शेन (Shane Bond) आणि सिड (Siddhartha Lahiri) यांचा साथीनं सर्वोत्तम संघ तयार करण्यावर भर देऊ." २०२२ मध्ये संगकाराच्या मार्गदर्शनाखालीच राजस्थानच्या संघाने फायनल गाठली होती. आगामी हंगामात ते फायनलमध्ये बाजी मारुन दुसऱ्यांदा IPL ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
कोच मिळाला कॅप्टन कोण?
राहुल द्रविड याच्यानंतर राजस्थान संघाला संगकाराच्या रुपात कोच मिळाला आहे. आता संघ कॅप्टन्सीची धूरा कुणाकडे सोपवणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. संजू सॅमसनच्या बदली खेळाडूच्या रुपात आलेल्या रवींद्र जडेजा याचे नाव सध्या आघाडीवर आहे. याशिवाय राजस्थानच्या ताफ्यात यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि ध्रुव जुरेल हे चेहरे आहेत, ज्यांच्या नावाचा कॅप्टन्सीसाठी विचार केला जाऊ शकतो.