"बचपन का प्यार..." सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! टीम इंडियाचा क्रिकेटर 'या' तारखेला उरकरणार लग्न

कधी अन् कुठ पार पडणार विवाह सोहळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:07 IST2026-03-10T12:14:35+5:302026-03-10T13:07:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Kuldeep Yadav Wedding Vanshika Invitation CM Yogi Check Wedding Date Venue Mussorie Lucknow | "बचपन का प्यार..." सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! टीम इंडियाचा क्रिकेटर 'या' तारखेला उरकरणार लग्न

"बचपन का प्यार..." सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! टीम इंडियाचा क्रिकेटर 'या' तारखेला उरकरणार लग्न

Kuldeep Yadav Wedding Vanshika Invitation CM Yogi : भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च, २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेली फायनल जिंकत विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. टीम इंडिया घरच्या मैदानात जेतेपद मिळवणारी देखील पहिली टीम ठरली. वर्ल्ड चॅम्पियन होताच संघातील स्टार खेळाडूनं लग्नाचा मुहूर्त काढला आहे. भारताच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग असलेला कुलदीप यादव याच आठवड्या लग्नबंधनात अडकणार आहे. 

कधी अन् कुठ पार पडणार विवाह सोहळा?

१४ मार्चला मसूरी येथे कुलदीप यादव वंशिकासोबतत सात फेरे घेणार आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी या जोडीचा साखरपुडा उरकला होता. १७ मार्चला लखनौ येथील सेंट्रम हॉटेलमध्ये कुलदीप आणि वंशिका जोडीनं आपल्या मित्र परिवारासाठी भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजनही केले आहे. ४ जून २०२५ रोजी लखनौमध्ये कुलदीप-वंशिका या जोडीनं साखरपुडा उरकला होता. 

Video: Hardik Pandya विश्वचषक जिंकून भरमैदानात Mahieka Sharma सोबत थेट स्टेजवरच झोपला...

मुख्यमंत्रांनाही खास निमंत्रण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कुलदीप यादव (Kuldeep Yadav Wedding) याच्या लग्न आणि रिसेप्शनचे खास  निमंत्रण देण्यात आले आहे. क्रिकेटरचे वडील राम सिंह यादव यांनी लखनौ स्थित मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन लेकाच्या लग्नासाठी मुख्यमंत्र्यांना खास निमंत्रण दिले.

टीम इंडियासह परदेशी क्रिकेटपटूंचीही उपस्थिती ठरेल लक्षवेधी

क्रिकेटरच्या लग्नासंदर्भात जी माहिती समोर येत आहे त्यानुसार, १३ मार्च २०२६ रोजी हळदी आणि मेहंदीच्या कार्यक्रमासह लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. मसूरी स्थित रेस्तराँमध्ये क्रिकेटरच्या विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्न समारंभात भारतीय क्रिकेटरसह अन्य देशांतील काही क्रिकेटर्सची उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.


दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन आहे कुलदीप; वंशिकासोबतची लव्हस्टोरीही झक्कास

कुलदीप यादव हा दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघासोबत यंदाच्या हंगामात त्याला दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग लागला. याआधी २०२४ मध्ये तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. कुलदीप आणि वंशिका यांची लव्ह स्टोरी एकदम झक्कास आहे. ते दोघेही मूळचे कानपूरचे आहेत. बालपणीपासून ते एकमेकांना चांगले ओळखत होते. आधी घट्ट मैत्री अन् मग हळूहळू त्याचे प्रेमात रुपांतर झाले. आता जोडीनं आयुष्यभर एकमेकांसोबत नव्या इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. वंशिकाचे वडिल योगेंद्र सिंह चड्ढा हे एलआयसीमध्ये कार्यरत आहेत. वंशिकाने ऑस्ट्रेलियात उच्चशिक्षण घेतले आहे.

Web Title : वर्ल्ड चैंपियन बनते ही कुलदीप यादव करेंगे शादी, मुख्यमंत्री को निमंत्रण!

Web Summary : टी20 वर्ल्ड चैंपियन टीम के सदस्य क्रिकेटर कुलदीप यादव 14 मार्च को मसूरी में वंशिका से शादी करेंगे। लखनऊ में रिसेप्शन की योजना है। कुलदीप के पिता ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ को शादी का निमंत्रण दिया।

Web Title : World Champion Kuldeep Yadav to Marry Soon, Invites Chief Minister!

Web Summary : Cricketer Kuldeep Yadav, part of the T20 World Champion team, will marry Vashika on March 14 in Mussoorie. A reception is planned in Lucknow. Kuldeep's father invited Uttar Pradesh's Chief Minister Yogi Adityanath to the wedding.