Join us  

'अरे, मी काय वेडा आहे का?'; 'कॅप्टन कूल' धोनीची 'सटकते' तेव्हा...

दोन षटकानंतर धोनी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:39 PM

Open in App

नवी दिल्ली - भारतीय संघातील युवा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षभरापासून विरोधी संघातील फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका कुलदीप बजावताना आपल्याला पहायला मिळातेय. पण या त्याच्या यशामध्ये कॅप्टन कूल धोनीचा सहभग आहे. याचा खुलासा खुद्द कुलदीप यादवे केला आहे. एका मुलाखती दरम्यान कुलदीपने धोनी आपल्याला विकेटच्या पाठीमागून सतत मार्गदर्शन करत असल्यामुळे मला विकेट मिळतात असे सांगितले.  

मुलाखती दरम्यान कुलदीपने धोनी त्याच्यावर भडकल्याचा किस्साही सांगितला. एका सामन्यात माझ्या गोलंदाजीवर चौकर-षटकारांची बरसात होत होती. त्यावेळी धोनी माझ्याकडे आला आणि म्हणाला की, कव्हर काढून प्वाईंटचा खेळाडू पुढे घेऊयात. त्यावर धोनीला मी म्हणालो, क्षेत्ररक्षणात बदल नको.  त्यावर धोनीचा पारा चढला. रागात मला म्हणाला की, 300 वन-डे सामने खेळलेला मी वेडा आहे का? धोनीचा हा अवतार पाहून मी घाबरलो आणि क्षेत्ररक्षणात बदल केला. क्षेत्ररक्षणातील बदलानंतर लगेच मला विकेट मिळाली. त्यानंतर माही जो सांगतो ते ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचा मला आणि संघाला फायदा होते.  

याच मुलाखतीत कुलदीपसह चहलही हजर होता. यावेळी चहलनेही कॅप्टन कूल धोनी बद्दलची आपली आठवण शेअर केली. चहल म्हणाला की, ज्यावेळी मी भारतीय संघात  पदार्पण केले होते. माझ्या पहिल्या सामन्यावेळी मी धोनीला माही सर , माही सर म्हणून बोलत असे. दोन षटकानंतर धोनी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला माही सर नकोस म्हणू. एमएसडी किंवा माही भाई म्हण. तेव्हापासून मी धोनीला माही भाई म्हणतोय. 

टॅग्स :कुलदीप यादवएम. एस. धोनीभारतीय क्रिकेट संघ