IPL 2024: यंदा IPL मध्ये नक्कीच ६०० धावा करेन; KKR च्या स्टार खेळाडूचा दावा

Nitish Rana: आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी करून भारताच्या विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नितीश राणाने म्हटले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 05:53 PM2024-03-22T17:53:16+5:302024-03-22T17:53:54+5:30

whatsapp join usJoin us
Kolkata Knight Riders player Nitish Rana has said that he wants to play for Team India in the Twenty20 World Cup after performing well in IPL 2024 and in this season will score 600 runs | IPL 2024: यंदा IPL मध्ये नक्कीच ६०० धावा करेन; KKR च्या स्टार खेळाडूचा दावा

IPL 2024: यंदा IPL मध्ये नक्कीच ६०० धावा करेन; KKR च्या स्टार खेळाडूचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Match 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ला प्रारंभ होत आहे. आज सलामीचा सामना चेन्नईत खेळवला जात आहे. चेन्नईच्या संघाने सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे, तर आरसीबीच्या खात्यात अद्याप भोपळा आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने दोनवेळा किताब जिंकण्याची किमया साधली. पण, मागील दोन हंगामात केकेआरच्या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. २०२१ मध्ये शेवटच्या वेळी इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात केकेआरच्या संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. 

केकेरआरचा यंदाच्या हंगामातील पहिला सामना शनिवारी सनरायझर्स हैदराबादसोबत होणार आहे. श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे. अय्यरच्या नेतृत्वात केकेआर आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद मैदानात असणार आहे. केकेआरचा माजी कर्णधार नितीश राणाने आयपीएलच्या तोंडावर एक मोठा दावा केला आहे. २०२३ च्या हंगामात राणाने केकेआरचे नेतृत्व केले. पण संघाला साजेशी देखील कामगिरी करता आली नाही. 

नितीश राणाचा दावा 
नितीश राणाने आगामी आयपीएल हंगामाबद्दल बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले असून तो तंदुरूस्त आहे. मला आशा आहे की मला पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी घ्यावी लागणार नाही. अय्यर नक्कीच सर्व सामन्यांचे नेतृत्व करेल. पण जर परिस्थिती ओढावली अन् मला कर्णधार व्हावे लागले तर मी त्यासाठी देखील तयार आहे. कर्णधार म्हणून मला मागील वर्षी चांगला अनुभव मिळाला. राणा 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलत होता. नितीश राणाने मागील हंगामातील १४ सामन्यांमध्ये ४१३ धावा केल्या. यासह तो केकेआरकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. पण, यंदाच्या हंगामात ६०० धावा करण्याचे लक्ष्य असल्याचे तो सांगतो. जेणेकरून भारताच्या ट्वेंटी-२० संघात त्याला स्थान मिळेल. 

नितीश राणा आणखी म्हणाला की, आपल्या देशासाठी खेळावे ही प्रत्येकाची इच्छा असते. मला देखील वाटते की, भारताच्या ट्वेंटी-२० संघात आपली निवड व्हावी. पण आताच्या घडीला मी केवळ आयपीएलचा विचार करत आहे. मला विश्वास आहे की, यंदाच्या हंगामात मी ६०० धावांचा आकडा पार करेन.

Web Title: Kolkata Knight Riders player Nitish Rana has said that he wants to play for Team India in the Twenty20 World Cup after performing well in IPL 2024 and in this season will score 600 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.