Ranji Trophy Final ... अन् टीम इंडियाचा स्टायलिश बॅटर KL राहुल चक्क गोलंदाजी करताना दिसला (VIDEO)

फलंदाजीसह यष्टीरक्षकाच्या रुपात छाप सोडणाऱ्या KL राहुलनं १० वर्षांनी केली गोलंदाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:43 IST2026-02-28T13:43:14+5:302026-02-28T13:43:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
KL Rahul Was Seen Bowling Last Day Of Karnataka vs Jammu and Kashmir Ranji Trophy Final He Had Not Done First Class Cricket Since 2015 Watch Video | Ranji Trophy Final ... अन् टीम इंडियाचा स्टायलिश बॅटर KL राहुल चक्क गोलंदाजी करताना दिसला (VIDEO)

Ranji Trophy Final ... अन् टीम इंडियाचा स्टायलिश बॅटर KL राहुल चक्क गोलंदाजी करताना दिसला (VIDEO)

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित रणजी करंडक स्पर्धेतील जेतेपदासाठीचा अंतिम सामना जम्मू काश्मीर विरुद्ध कर्नाटक यांच्यात रंगल्याचे पाहायला मिळाले. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या हुबळीच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात पाचव्या आणि अखेरच्या दिवशी एक असा क्षण पाहायला मिळाला जो पाहून सारेच थक्क झाले. जम्मू काश्मीरच्या संघाने पहिल्यांदा फायनल खेळतान ट्रॉफी जिंकूनच जायचं या इराद्याने कर्नाटकच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. जम्मू काश्मीरच्या फलंदाजांसमोर कर्नाटकच्या गोलंदाजांचे खांदे पडल्यावर चक्क लोकेश राहुल गोलंदाजी करताना दिसून आले.  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

फलंदाजीसह यष्टीरक्षकाच्या रुपात छाप सोडणाऱ्या KL राहुलनं १० वर्षांनी केली गोलंदाजी

टीम इंडियातील स्टायलिश क्रिकेटर फलंदाजीसह यष्टीमागची जबाबदारी बजावताना दिसला आहे. त्याने गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. २०१५ नंतर पहिल्यांदाच लोकेश राहुल प्रथम श्रेमी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. या सामन्यात त्याने दोन षटके गोलंदाजी करताना १५ धावा खर्च केल्या. 

Ranji Trophy Final: कामरान इक्बालची कडक सेंच्युरी; CM ओमर अब्दुल्लांनी दिलं स्टँडिंग ओव्हेशन! (VIDEO)

फलंदाजीत फ्लॉप शो!

रणजीच्या फायनलमध्ये जम्मू काश्मीरच्या संघाने कर्नाटकसमोर मोठी धावसंख्या उभारली. ५८४ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण फलंदाजीत तो सपशेल अपयशी ठरला. तो फक्त १३ धावांची भर घालून माघारी फिरला. याशिवाय कर्णधार देवदत्त पडिक्कल आणि करुण नायर हे स्टार खेळाडूही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. परिणामी कर्नाटकचा संघ फायनलमध्ये पहिल्यांदा फायनल खेळणाऱ्या जम्मू काश्मीरसमोर कमी पडला. कर्नाटकच्या संघाने सेमीफायनलमध्ये उत्तराखंडसमोर पहिल्या डावात ७०० पेक्षा अधिक आणि दुसऱ्या डावात ३०० पेक्षा अधिक धावा करत फलंदाजीतील ताकद दाखवली होती. या सामन्यात केएल राहुलनं पहिल्या डावात २११ चेंडूत १४१ धावंची खेळी केली होती.  दुसऱ्या डावातही त्याने नाबाद ८६ धावांची खेळी केली होती. पण फायनलमध्ये ना तो या खेळीची पुनरावत्ती करु शकला ना कर्नाटकच्या फलंदाजीली ताकद दिसली.
 

Web Title : रणजी फाइनल: केएल राहुल 10 साल बाद गेंदबाजी करते दिखे, बल्ले से विफल

Web Summary : रणजी ट्रॉफी फाइनल में केएल राहुल ने 10 साल बाद गेंदबाजी कर सबको चौंका दिया। हालांकि, बल्ले से वह प्रभाव डालने में विफल रहे, उन्होंने सिर्फ 13 रन बनाए और जम्मू-कश्मीर के खिलाफ कर्नाटक संघर्ष करता दिखा।

Web Title : Ranji Final: KL Rahul Bowls After 10 Years, Fails with Bat

Web Summary : In the Ranji Trophy final, KL Rahul surprised everyone by bowling after 10 years. However, he failed to make an impact with the bat, scoring only 13 runs as Karnataka struggled against Jammu & Kashmir.