Join us

IND vs AUS : साईची सेंच्युरी; रिटायर हर्ट KL राहुल पुन्हा मैदानात उतरला! टीम इंडियाचा विक्रमी विजय

रिटायर हर्ट झालेला KL राहुल पुन्हा  मैदानात उतरला, द्विशतक फक्त २४ धावांनी हुकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:53 IST

Open in App

India A vs Australia A, 2nd Unofficial Test : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी लोकेश राहुलनं भारतीय 'अ' संघाकडून मैदानात उतरत आपला क्लास दाखवलाय. त्याच्या दमदार दीड शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्धची ४०० पारची लढाई ५ विकेट्स राखून जिंकलीये. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिय 'अ' संघाने ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली टीम भारतीय संघासमोर ४१२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा यशस्वी पाठलाग करत भारत 'अ' संघाने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी आपल्या नावे केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दोन शतकवीरांच्या जोरावर भारतीय संघानं जिंकली ४०० पारची लढाई

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने पहिल्या डावात ४२० धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव १९४ धावांत आटोपल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाचा डाव १८५ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ २०० धावांच्या आत आटोपला. पण त्यांनी भारतीय संघासमोर ४१२ धावांचे मोठे टार्गेट सेट केले होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना  लोकेश राहुनं नाबाद १७६ धवांची खेळी केली. त्याला साई सुदर्शन याने १७२ चेंडूत १०० धावा करत उत्तम साथ दिली. याशिवाय भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करणाऱ्या ध्रुव जुरेल याने ६६ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी कैेली. हे तिघेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी टीम इंडियात आहेत. त्यांची ही दमदार कामगिरी शुबमन गिलच्या टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी अशीच आहे.

PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)

रिटायर हर्ट झालेला KL राहुल पुन्हा  मैदानात उतरला, द्विशतक फक्त २४ धावांनी हुकलं

तिसऱ्या दिवशी केएल राहुल ७४ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला होता. चौथ्या दिवशी तो पुन्हा मैदानात उतरला. त्याने नाबाद १७६ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचे द्विशतक अवघ्या २४ धावांनी हुकले. भारत 'अ' संघाकडून फिरकीपटू मानव सुथार याने सर्वाधिक ८ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराजनं ३ विकेट्स घेतल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : India A chases 412, KL Rahul & Sai smash tons!

Web Summary : KL Rahul's unbeaten 176 and Sai Sudharsan's 100 powered India 'A' to a stunning victory over Australia 'A', chasing down a 412-run target. Dhruv Jurel added a crucial 56. India A won the series 1-0.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलमोहम्मद सिराज