Join us  

लॉकडाऊनचा नियम मोडला अन् पुणे पोलिसांनी KKRच्या फलंदाजाकडून दंड वसूल केला!

राहुलनं आयपीएलमध्ये ५२ सामन्यांत ११७५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१मध्ये त्यानं ७ सामन्यांत १८७ धावा केल्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:41 AM

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) फलंदाज राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) याच्यावर पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. कोरोना लॉकडाऊन असताना राहुल त्रिपाठीनं मास्क न लावता गाडी चालवली अन् पुण्यातील कोंढवा भागात त्याच्यावर ही कारवाई केली गेली. ( Police on Friday penalised cricketer Rahul Tripathi for allegedly violating Covid-19 lockdown norms). इंडियन प्रीमिअर लीगमध्ये KKRचे प्रतिनिधित्व करणारा राहुल स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्राकडून खेळतो.  कोलकाता, हैदराबाद दुसऱ्या टप्प्यात नेतृत्वबदल करणार; जाणून घ्या नवा कर्णधार कोण असणार!

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा एकदा काही अंशी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे काम सुरू होते. पोलिसांच्या माहितीनुसार राहुल हा खडी मशीच चौक येथे कारमधून जात होता आणि त्यानं मास्क घातले नव्हते. घराबाहेर पडण्याचे ठोस कारणही तो सांगू शकला नाही, त्यामुळे त्याच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असे कोंढवा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी सरदार पाटील यांनी सांगितले.  Photo : महेंद्रसिंग धोनी होणार पुणेकर; पिंपरी-चिंचवड येथे घेतलंय लै भारी घर!

राहुलनं आयपीएलमध्ये ५२ सामन्यांत ११७५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१मध्ये त्यानं ७ सामन्यांत १८७ धावा केल्या आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपुणेकोलकाता नाईट रायडर्स