Join us  

KKR vs SRH Latest News : शुबमन गिल कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार असायला हवा; दिग्गज खेळाडूची मागणी

KKR vs SRH Latest News : KKRने 18 षटकांत 3 बाद 145 धावा करून पहिला विजय मिळवला. गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या.  

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 11:44 PM

Open in App

KKR vs SRH Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडले. KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या कल्पक नेतृत्वानं बाजी मारली. गोलंदाजांचा सुरेख वापर अन् उत्तम क्षेत्ररक्षण लावताना कार्तिकनं SRHच्या धावांवर लगाम लावण्यात यश मिळवलं. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. शुबमन गिलनं अर्धशतकी खेळी करताना संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. या दमदार खेळीनंतर शुबमनला KKRचा कर्णधार बनवा, अशी मागणी इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाने केली आहे.  KKR vs SRH Latest News & Live Score

पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध

डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना SRHचा डाव सावरला. वॉर्नरने 30 चेंडूंत 36 धावा केल्या. वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.  आंद्रे रसेलनं ( Andre Russell) ही भागीदारी संपुष्टात आणली. 18व्या षटकात मनीष पांडे 38 चेंडूंत 51 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला. सहा 30 धावांवर रन आऊट झाला. SRHला 20 षटकांत 4 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली.  KKR vs SRH Latest News & Live Score

लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात खलील अहमदनं KKRचा सलामीवीर सुनील नरीन ( Sunil Narine) याला बाद केले. त्यानंतर आलेल्या नितिश राणानं ( Nitish Rana) SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 13 चेंडूंत 6 चौकारांसह 26 धावा केल्या. त्यानंतर मनीष पांडेनं इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह भक्कम भागीदारी करताना KKRचा यंदाच्या पर्वातील पहिला विजय पक्का केला. KKRने 18 षटकांत 3 बाद 145 धावा करून पहिला विजय मिळवला. गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या.   KKR vs SRH Latest News & Live Score

या सामन्यानंतर इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन यानं ट्विट केलं की, शुबमन गिल हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार असायला हवा.

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादशुभमन गिल