KKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध

गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या.  

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 11:34 PM2020-09-26T23:34:33+5:302020-09-26T23:35:05+5:30

whatsapp join usJoin us
Pat Cummins rattles Jonny Bairstow's stumps with peach off a delivery in KKR vs SRH clash - Watch  | KKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध

KKR vs SRH Latest News : पॅट कमिन्सनं उडवला जॉनी बेअरस्टोचा त्रिफळा; SRHचा फलंदाज झाला स्तब्ध

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KKR vs SRH Latest News :  Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडले. सामन्याच्या पहिल्या टप्प्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या कल्पक नेतृत्वानं बाजी मारली. गोलंदाजांचा सुरेख वापर अन् उत्तम क्षेत्ररक्षण लावताना कार्तिकनं SRHच्या धावांवर लगाम लावण्यात यश मिळवलं. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावली. शुबमन गिलनं अर्धशतकी खेळी करताना संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. KKRनं अखेर IPL 2020तील पहिल्या विजयाची चव चाखली. या सामन्यात IPL 2020 Auction मधील महागडा गोलंदाज पॅट कमिन्सनं ( Pat Cummins) SRHला पहिला धक्का दिला. KKR vs SRH Latest News & Live Score

IPL 2020तील आतापर्यं झालेल्या 7 सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या कर्णधारानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण, आजचा सामना त्याला अपवाद ठरला. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय SRHला महागात पडला. जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यांनी SRHला सावध सुरुवात करून दिली. मागील सामन्यात महागडा ठरलेल्या पॅट कमनिन्सनं ( Pat Cummins) चौथ्या षटकात KKRला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंचांनी बेअरस्टोला झेलबाद दिले, परंतु DRSमध्ये तो नाबाद असल्याचे समोर आले. मात्र, पुढच्याच चेंडूवर कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. KKR vs SRH Latest News & Live Score

पॅट कमिन्सला KKR ने 15.5 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते, परंतु मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यानं 4 षटकांत 49 धावा दिल्या. त्यामुळे त्याची चेष्टा केली गेली. पण, आज त्यानं कंजूस गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत 19 धावा देताना 1 विकेट घेतली.  

पाहा व्हिडीओ...

सामन्याचा निकाल काय लागला
वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना SRHचा डाव सावरला. वॉर्नरने 30 चेंडूंत 36 धावा केल्या. वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.  आंद्रे रसेलनं ( Andre Russell) ही भागीदारी संपुष्टात आणली. 18व्या षटकात मनीष पांडे 38 चेंडूंत 51 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला. सहा 30 धावांवर रन आऊट झाला. SRHला 20 षटकांत 4 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात खलील अहमदनं KKRचा सलामीवीर सुनील नरीन ( Sunil Narine) याला बाद केले. त्यानंतर आलेल्या नितिश राणानं ( Nitish Rana) SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 13 चेंडूंत 6 चौकारांसह 26 धावा केल्या. त्यानंतर मनीष पांडेनं इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह भक्कम भागीदारी करताना KKRचा यंदाच्या पर्वातील पहिला विजय पक्का केला. KKRने 18 षटकांत 3 बाद 145 धावा करून पहिला विजय मिळवला. गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या.  

Web Title: Pat Cummins rattles Jonny Bairstow's stumps with peach off a delivery in KKR vs SRH clash - Watch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.